घरमहाराष्ट्र'त्या' अधिकाऱ्याला शोधून काढा - नितेश राणे

‘त्या’ अधिकाऱ्याला शोधून काढा – नितेश राणे

Subscribe

तिवरे धरणफुटी प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीका होत असताना नितेश राणेंनी देखील याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तिवरे धरण दुर्घटनेनंतर आता चहुबाजूने सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका होत असताना आमदार नितेश राणे यांनी ‘ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला शोधून काढा’, असे सांगत जोरदार टीका केली आहे. ‘तिवरे धरणाबाबतच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. मग तक्रारी असताना अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले?’ असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्याम, ‘धरण कोणत्याही सरकारच्या काळात उभारलेले असले तरी तक्रारी करून जर अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर ती हलगर्जी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर आणि कंत्राटदारावर कारवाई व्हायला हवी’, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच ‘ही घटना दुर्देवी असून, आपण स्वत: घटनास्थळी जाणार’, असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.


धरणफुटीचा व्हिडिओ पाहिलात का? – तिवरे धरणाला भगदाड!

कसे फुटले धरण?

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारात तिवरे धरण आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. आठ ते साडेआठच्या सुमारास धरणातून पाणी वाहू लागले. आणि पुढच्या तासाभरातच धरणाला मोठं भगदाड पडून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरलं. या पाण्यामुळे त्याच्या वाटेतल्या ७ गावांना फटका बसला असून २०हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. आत्तापर्यंत या घटनेमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध एनडीआरएफकडून घेतला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा!’

राष्ट्रवादी काँग्रेसनेही केली कारवाईची मागणी

या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे. नितेश राणेंप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही निशाणा साधला आहे. ‘या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ‘फक् १९ वर्षांमध्ये धरण फुटतेच कसे?’ असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -