घरमहाराष्ट्रचरित्राच्या संशयावरुन पत्नीची हत्या; तरुणाने केली आत्महत्या

चरित्राच्या संशयावरुन पत्नीची हत्या; तरुणाने केली आत्महत्या

Subscribe

ठाण्यामध्ये एका तरुणाने चरित्राच्या संशयावरुन आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ठाण्यामध्ये चरित्राच्या संशयावरुन एका तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ला देखील संपवले आहे. या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पुर्वी त्याने त्याच्या सासरच्या मंडळींना फोन करुन सांगितले की, ‘मी तुमच्या मुलीला देवाघरी पाठवले’. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी २ वाजता श्रीनगर भागातील जुनागाव गवते गल्ली या ठिकाणी घडली. अर्चना सांगळे आणि सुनिल सांगळे अशी मृतांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून सुनिल सांगळे आणि अर्चना सांगळे या दोन्ही पती-पत्नींमध्ये सततचे भांडण सुरु होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सुनिलने अर्चनाची हत्या केली. विशेष म्हणजे सुनिलने आपल्या मुलीसमोर पत्नीची हत्या केली. निलने मुलीला सोबत घेऊन अर्चनाच्या मृतदेहासोबत रात्र काढली. त्यानंतर आज दुपारी २ वाजता आपल्या मुलीसमोर आत्महत्या केली. सुनिलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या सासरच्या मंडळींना ‘मी तुमच्या मुलीला देवाघरी पाठवले’ असे सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी सुनिलने घरातील भिंतीवर काही जणांची नाव लिहीली आहेत. तसेच हत्या आणि आत्महत्या करण्याचे कारणही लिहिले आहे. श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -