घरक्राइमPune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाविरोधात रेड...

Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाविरोधात रेड कॉर्नर नोटीस

Subscribe

पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप उर्फ सनी धुनिया याच्याविरोधात आता रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : पुणे गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल चार हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. मंगळवारी (ता. 20 फेब्रुवारी) पोलिसांनी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील दोन गोदामांवर आणि एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकून 600 किलो ‘म्याव-म्याव’ ड्रग्ज जप्त केले. याच प्रकरणात दिल्लीतील गोदाम आणि इतर भागांतून आणखी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप उर्फ सनी धुनिया याच्याविरोधात आता रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Drugs Case: Red corner notice against Sandeep Dhunia, the main mastermind)

हेही वाचा… Dawood Ibrahim : दाऊदचा मेहुणा खल्लास; उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या

- Advertisement -

पुण्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकणरणाचा अधिक तपास करण्यात येत असताना अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला संदीप धुनिया याची ओळख पटविण्यात आली आहे. तो मुळचा पाटण्याचा असून तो नेपाळमधील काठमांडू आणि तिथून कुवैतला पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता इंटरपोलची मदत घेतली जाणार असून धुनिया आणि ड्रग्स प्रकरणी तपासात आता केंद्रीय यंत्रणा देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एनआयए, एनसीबी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणा सुद्धा या प्रकरणात सहभागी होऊन तपास करतील अशी माहिती समोर आली आहे.

पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला संदीप धुनिया हा कुवेतला पळाल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्यामुळे आता त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून देण्यात आली. पुणे पोलिसांनी या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तर, पुणे आणि दिल्लीतील प्रत्येकी तीन जणांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतही छापे टाकले. अनेक जण पुणे पोलिसांच्या चौकशीत असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -