घरमहाराष्ट्रManohar Joshi : उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, संजय राऊतांसह इतर नेते...

Manohar Joshi : उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, संजय राऊतांसह इतर नेते मुंबईत परतणार

Subscribe

लोकसभा प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. परंतु, मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : बाळासाहेबांचा कडवट, सच्चा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे आज शुक्रवारी पहाटे 03 वाजताच्या सुमारास निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनामुळे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्याचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. लोकसभा प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. परंतु, या वृत्तानंतर त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला असून उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांसह दुपारी अंत्ययात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Manohar Joshi: Uddhav Thackeray Buldhana tour cancelled, Sanjay Raut and other leaders will return to Mumbai)

हेही वाचा… Manohar Joshi Passed Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे कालपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून ते पक्षाची मोर्चेबांधणी करणार आहेत. परंतु, मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा हा नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास व अन्य नेतेही उपस्थित आहेत. त्यामुळे हे सर्वच नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत बुलढाण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे राजकारणापासून दूर होते. प्रकृती अस्वस्थामुळे ते राजकारणात सक्रीय नव्हते. तर बुधवारी (ता. 21 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी दादरमधील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, आज शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजून 2 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांची ‘सर’ म्हणून ओळख होती. कालांतराने राजकारणातही त्यांची सर म्हणूनच ओळख झाली. मनोहर जोशी यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर जोशी सर यांची अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्ययात्रेत उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेतेही सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -