घरफोटोगॅलरीPHOTO : राजकारणात 'सर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर जोशी यांचा जीवनप्रवास

PHOTO : राजकारणात ‘सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर जोशी यांचा जीवनप्रवास

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज, शुक्रवारी 23 फेब्रुवारीला निधन झाले आहे. वयाच्या 86व्या वर्षी मनोहर जोशींनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंच्या खास मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख होती.

- Advertisement -

ज्येष्ठ राजकारणी मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. गरीब कुटुंबात जन्म घेतल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वाने लहानपणापासून त्यांच्या नशिबी संघर्ष आला. मनोहर जोशी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशींनी मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

- Advertisement -

 

मनोहर जोशी यांनी 2 डिसेंबर 1961 रोजी कोहिनूर क्लास सुरू केला. या क्लासचे रुपांतर प्रिन्सिपॉल मनोहर गजानन जोशी यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांची ‘सर’ म्हणून ओळख होती.

मनोहर जोशी यांनी1967 साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात स्वतःला झोकून दिले. मनोहर जोशी ज्या मुंबई महापालिकेच्या इमारतीमध्ये लिपिकाची नोकरी केली, त्याच महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पाऊल टाकले. 1976 ते 19977 या वर्षी मनोहर जोशी हे महापौर देखील राहिले होते.

1990 साली शिवसेनेचे 52 आणि भारतीय जनता पक्षाचे 42 आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. 1991 साली छगन भुजबळ यांच्या समवेत 15 आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद भारतीय जनता पक्षाच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले.

 

1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. बाळासाहेबांनी एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री केल्याने त्यांच्यावर सडकून टीका झाली होती.

मनोहर जोशी यांना 1999 साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आधी अवजड उद्योग मंत्री म्हणून मनोहर जोशी यांची वर्णी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -