घरमनोरंजनMaratha Reservation : आरक्षणावर गौतमी पाटील म्हणाली; "मराठा समाजाला कुणबी..."

Maratha Reservation : आरक्षणावर गौतमी पाटील म्हणाली; “मराठा समाजाला कुणबी…”

Subscribe

गौतमी पाटीलचा 'घुंगरू' हा चित्रपट 15 डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याविरोधात ओबीसी नेत्यांनी सभा घेत मनोज जरांगे पाटील यांना विरोध केला आहे. सध्या राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मलाही कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सेलिब्रेटी गौतमी पाटील दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारल्यावर गौतमी पाटील म्हणाली, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे की, आज अनेकांना आरक्षण हवे आहे तर ते मिळालेच पाहिजे. मला देखली आरक्षण हवे आहे. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. कारण कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची झाली होती. सध्या चित्र बदलले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर…; आरक्षणाच्या मुद्द्यावरून कडूंचा हल्ला

लग्नाबद्दल गौतमी पाटील म्हणाली…

राजकारण एन्ट्री करणार का? या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली, “मी राजकारणात अजिबात जाणार नाही. लग्नासंदर्भात प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “लग्नाचा कोणाताही विचार अद्याप तरी माझ्या डोक्यात आलेला नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : मराठा आरक्षणावरील भुजबळांचे भाषण एकांगी, भास्कर जाधवांची सडकून टीका

गौतमीचा ‘घुंगरू’ 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार

‘घुंगरू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यावर गौतमी पाटील म्हटली, मी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असून नवीन चित्रपट मिळाले तर काम करेन. पण मी चित्रपट मिळाले तरीही डान्स करणे सोडणार नाही. गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ हा चित्रपटात बाबा गायकवाड हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर चित्रपट 15 डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -