घरमहाराष्ट्रUday Samant : FDI मध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकाला टाकले मागे; उदय सामंतांनी...

Uday Samant : FDI मध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकाला टाकले मागे; उदय सामंतांनी आकडेवारी केली जाहीर

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशासाठी मंगळवारी आमदार आदित्य ठाकरे नागपुरात दाखल झाले होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील दीड वर्षांत किती उद्योग महाराष्ट्रात आणले असा सवाल मंगळवारी (12 डिसेंबर) उद्योगमंत्री उदय सामंत यांना केला होता. त्याला उत्तार म्हणून उदय सामंत यांनी आज बुधवारी (13 डिसेंबर) ट्वीटरवर पोस्ट करत उत्तर दिले आहे. (Uday Samant Maharashtra overtakes Gujarat Karnataka in FDI Udaya Samanta released the statistics)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंगळवारी आमदार आदित्य ठाकरे नागपुरात दाखल झाले होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मागील दीड वर्षामध्ये आपल्या राज्यात उद्योगमंत्री म्हणून तुम्ही परकीय गुंतवणूक आणला आहे का? मागे ज्या ट्रीप्स झाल्या त्यातून उद्योग आणि रोजगार निर्माण झाला आहे का? हा माझा प्रश्न आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्या प्रश्नाला आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : आरक्षणावर गौतमी पाटील म्हणाली; “मराठा समाजाला कुणबी…”

उद्योगमंत्र्यांनी ट्वीट करत केले आकडे जाहीर

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पोस्ट करत महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत FDI मध्ये देशात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) अहवाल जारी केला आहे. या तिमाहीत महाराष्ट्राने 28,868 कोटी विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यानंतर 12,891 कोटी रुपयांसह गुजरात दुसऱ्या स्थानावर आणि 11,414 कोटी रुपयांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी त्यांनी पोस्टमधून जाहीर केली आहे. पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राज्यात महायुती सरकारची यशस्वी घौडदौड सुरू आहे. गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन! असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -