घरमहाराष्ट्रWinter Session : मराठा आरक्षणावरील भुजबळांचे भाषण एकांगी, भास्कर जाधवांची सडकून टीका

Winter Session : मराठा आरक्षणावरील भुजबळांचे भाषण एकांगी, भास्कर जाधवांची सडकून टीका

Subscribe

नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 293 अंतर्गत मराठा आरक्षणाच्या चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर काल (ता. 12 डिसेंबर) चर्चा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आज (ता. 13 डिसेंबर) पुन्हा या प्रस्तावावर भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याद्वारे चर्चेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. परंतु, त्यांनी केलेले भाषण एकांगी असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भुजबळांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत आहेत, ते कोणाकडून मागणी करत आहेत, आम्हा विरोधकांकडून… असे म्हणत भास्कर जाधव यांनी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. (Winter Session: Chhagan Bhujbal’s speech on Maratha reservation is monotonous, Bhaskar Jadhav’s sharp criticism)

हेही वाचा –  Winter Session : विधानसभेत भुजबळांचा खळबळजनक दावा, म्हणाले – “मला गोळी मारली जाऊ शकते…”

- Advertisement -

यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी मी आज उभा आहे. या प्रस्तावावर एखादं दुसरा प्रस्ताव सोडला तर कुठेही अशांतता निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या समाजाचा उल्लेख करताना धनगर समाजाला आरक्षण असताना त्यांना एसटीतून आरक्षण हवे आहे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. आता होत असलेल्या या चर्चेतून कायद्याचा किस काढला जात आहे. नियमांवर चर्चा केली जात आहे. पण सर्वजण शेवटी एकच सांगत आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.

पण आज छगन भुजबळ हे इकडून तिकडे बोलत आहेत. मात्र, त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची मागील वेळेस याच सभागृहात झालेली जुगलबंदी त्याचा प्रत्येक शब्द मी आणला आहे. संशयाची सुई कोण फिरवत आहे. कालपासून अनेकांनी मराठा आरक्षणावर भाषणे केली. आशिष शेलार यांनी काही राजकीय वक्तव्य टाळली असती तर त्यांचे भाषण सर्वोत्कृष्ट ठरले असते. पण एकांगी भाषण हे फक्त भुजबळ यांचे झाले. नाव घेऊन सांगतो. आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात, वरिष्ठ मंत्री आहात. काय घडवायचे काय आहे या महाराष्ट्रात? राज्यात गेल्या सहा महिन्यात नऊ जातीय दंगली झाल्या. शाहू महाराज यांच्या कोल्हापुरमध्ये दंगली झाल्या, यातून नेमके काय सिद्ध करायचे आहे, असा प्रश्न यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

तर, मराठ्यांवर संरक्षणाची जबाबादारी होती. इंग्रज आले आणि त्यांनी डोकं चालवले. मराठे आपल्याला कापायला कमी करणार नाहीत म्हणून लढाई केली आणि त्यामधून तरुण मुलांना कापण्यात आले. त्यानंतर सिलिंग अॅक्ट आला, कुळ कायदा लागू झाला. कोकणात जमीन कोणाला जास्त नाही. मग मराठ्यांना उत्पादनाचे साधन काय आहे? आम्ही रयतेचे राजे, जहागीरदार म्हणून मिरवत राहिलो, मात्र पुढचे भविष्य अंधकारमय करुन ठेवले. मराठा समाजाची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. नेहमी सांगण्यात येते की, सर्वाधिक मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले, पण मुख्यमंत्री पद उत्पन्नाचे साधन की समाजसेवेचे साधन आहे. चार दोन लोक श्रीमंत आहेत म्हणजे सर्वच मराठे श्रीमंत आहेत असे होत नाही. मराठे शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मागत आहेत, राजकारणात नाही, असेही भास्कर जाधव यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -