घरमहाराष्ट्रNashik Constituency : भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; तर भुजबळ म्हणतात, जागा आमच्यासाठी सुटत नाही...

Nashik Constituency : भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; तर भुजबळ म्हणतात, जागा आमच्यासाठी सुटत नाही तोपर्यंत…

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी असतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी ठाण्यात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करत नाशिकची जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला तर यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकच्या जागेबाबत चर्चा केली. याशिवाय अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या जागेची मागणी केली होती. याबाबत आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Nashik Constituency BJP Shiv Sena tug of war So Chhagan Bhujbal says this discussion cannot take place until the space is cleared for us

हेही वाचा – Vijaypat Singhania : इच्छा नसतानाही…; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

- Advertisement -

नाशिकच्या जागेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, तिन्ही पक्षांमध्ये या जागेबाबत चर्चा सुरू आहे. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. महायुतीमध्ये अनेक जागांवर एकमत झालं आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत सर्व पक्ष एकत्र बसून ठरवतील. मग कोणताही उमेदवार ठरला, तर त्याच्या मागे तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहतील. मात्र भुजबळ कुटुंबिय नाशिकसाठी आग्रही नाही, असे स्पष्ट करतानाच भुजबळ म्हणाले की, माध्यमांमध्येच तशी चर्चा होत आहे. पण, त्यात सत्य नाही. आमची केवळ एकच मागणी आहे. शक्यतो आम्हाला शिंदे गटाऐवढ्या जागा द्याव्यात. जास्तीत जास्त महायुतीच्या जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला गेलो होतो. कारण, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. त्यामुळे एका कामासंदर्भात आम्ही त्यांना भेटायला गेलो होते. यात कोणतंही राजकारण नाही. जर मला काही मागणी करायची असेल तर मी सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे करले. आम्ही सर्व एकत्र बसून ठरवू. त्यामुळे शिंदे गटाने अस्वस्थ होण्याचं कोणतंही कारण नाही. मीही तुमच्यातूनच आलो आहे. मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे त्यांची भेट घ्यावी लागते. लगेच चर्चा करून आम्ही बाहेर आलो होतो. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar Vs Pawar : मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय, रोहित पवारांकडून अजितदादा लक्ष्य

मतप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला हक्क

छगन भुजबळ म्हणाले की, प्रत्येक पक्षाला जागा मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यात भांडण आहे असं म्हणणं योग्य नाही. मतप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. नाशिक आम्हाला मिळाले तर आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. त्यामुळे जागा आमच्यासाठी सुटत नाही तोपर्यंत काही चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेबाबत मनसेमुळे कुठेही पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची शक्ती वाढणार आहे. त्यांच्यामुळे महायुतीमध्ये कोणतीही अडचण होणार नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -