घरदेश-विदेशVijaypat Singhania : इच्छा नसतानाही...; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

Vijaypat Singhania : इच्छा नसतानाही…; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

Subscribe

मुंबई : रेमंडचे एमडी आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया नेहमीच आपल्या कौटुंबिक वादामुळे माध्यमांत चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांची घरवापसी झाल्याची बातमी समोर आली होती. गौतम सिंघानिया यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. पण आता गौतम सिंघानिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी त्या दोघांच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. (Vijaypat Singhania revealed about his meeting with Gautam Singhania)

हेही वाचा – Arunachal Pradesh : अरुणालच आमचेच… महिन्याभरात चौथ्यांदा दावा; चीनचे दावे बिनबुडाचे, भारताचे प्रत्युत्तर

- Advertisement -

20 मार्च रोजी गौतम सिंघानिया यांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, आज मी आनंदी आहे, कारण माझे वडील घरी परतले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. बाबा तुमच्या आरोग्यासाठी सदैव शुभेच्छा. गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांचे फोटो बघता दोघांमधील वाद मिटल्याची चर्चा झाली होती. मात्र आता विजयपत सिंघानिया यांनी याबाबत खुलासा केला आहे.

- Advertisement -

विजयपत सिंघानिया यांनी त्या दोघांच्या भेटीबाबत खुलासा करताना म्हटले की, “मी 20 मार्चला विमानतळावर जात होतो, तेव्हा गौतमच्या असिस्टंटने मला घरी येण्याची विनंती केली. मी त्याला नकार दिला, पण त्याने पुन्हा विनंती केली. त्यानंतर गौतमने माझ्याशी संपर्क केला आणि माझ्याकडे वेळ मागून घेतली. मी त्याला पाच मिनिटांची वेळ दिली. कॉफी प्यायला येईन आणि पाच मिनिटं थांबेन असं मी गौतमला सांगितलं. इच्छा नसतानाही मी त्याला भेटायला गेलो. गौतम माझ्यासोबत फोटो काढून माध्यमांना संदेश देऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने मला बोलवलं होतं.

हेही वाचा – Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेविरोधात आप रस्त्यावर; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

गौतमचा हेतू मला समजला नाही. मी काही मिनिटांनी तिथून निघालो आणि विमानतळाकडे गेलो. त्यानंतर काही वेळातच त्याच्यासह माझे फोटो होते आणि वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे पूर्णतः चुकीचं आहे. गौतमचे आमंत्रण कॉफीसाठी किंवा आमच्यातील मतभेद सोडवण्यासाठी नव्हते. खरं तर त्यामागील “खरा हेतू” वेगळाच होता. मी जेके हाऊसमध्ये 10 वर्षात पहिल्यांदाच प्रवेश केला होता आणि मला वाटत नाही की मी पुन्हा त्याठिकाणी परत जाईल, असं विजयपत सिंघानिया यांनी इंडिया टुडेशी बोलताना स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -