घरताज्या घडामोडीNarayan Rane Vs Shivsena : ही कसली ठाकरी शैली ? महापौरांचा सवाल

Narayan Rane Vs Shivsena : ही कसली ठाकरी शैली ? महापौरांचा सवाल

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात पडसाद शिवसेनेतून अनेक शहरातून आणि जिल्ह्यातून उमटत आहे. संतप्त शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला असतानाच काही ठिकाणी पोस्टरबाजी तर काही ठिकाणी दगडफेकीच्या माध्यमातूनही पडसाद उमटले आहे. या दरम्यानच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या ठाकरे शैलीवर जोरदार टीका केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या काळात नारायण राणे यांचे कसे कान टोचले गेले होते, याबाबतचा खुलासाही त्यांनी केला आहे. (Mayor kishori pednekar remarks on narayan ranes statement for uddhav thackeray )

आपली संस्कृती राखून बोलण, वागण हे बाळासाहेबांनाही नेहमीच अपेक्षित होत. बाळासाहेब असतानाही नारायण राणेंना त्यांनी समज दिली होती. बराचवेळा बाळासाहेबांकडून नारायण राणेंचे कान टोचण्यात आले होते. आपण आब राखून बोलल आणि वागल पाहिजे अस बाळासाहेबांचेही म्हणने असायचे. म्हणूनच सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे जे वागत आणि बोलत आहे, ती ठाकरे शैली नव्हे अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यांनी शिवसेना राणेंच्या या वक्तव्याला नक्कीच उत्तर देईल असेही स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

ही कसली ठाकरी शैली ?

नारायण राणे शिवसेनेत असताना बाळासाहेबांकडून अनेकदा त्यांच्या वागणुकीबद्दल सांगितले. जायचे आपण आब राखून बोलले आणि वागले पाहिजे असा बाळासाहेबांचा अट्टाहास होते. आपली संस्कृती राखून वागण आणि बोलण हे बाळासाहेबांनाही अपेक्षित होते. पण नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने भाजप ज्या ठाकरी शैलीचा आधार घेत आहे, तशी ठाकरी शैली ही नाहीच असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरी शैली कोणावरही सूड उगवत नाही असेही त्या म्हणाल्या. नारायण राणे सध्या फक्त पळवाटा काढत आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याला कानाखाली मारण्याची भाषा जेव्हा नारायण राणे करतात तेव्हा ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, याचेही भान त्यांनी ठेवायला हवे होते. पण बाळासाहेबांच्या सुपुत्राविरोधात ही कसली ठाकरी शैलीतील भाषा असाही सवाल महापौरांनी यावेळी केला. आधी भाजपने नीट भाषा शिकून घ्यावी, नाहीतर नारायण राणेंनी भाजपला बुडवले नाही म्हणजे मिळवले असाही टोला त्यांनी लागवला.


हे ही वाचा – ‘नारायण राणेंना अटक करुनच दाखवा’, भाजपाचे ठाकरे सरकारला आव्हान

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -