घरमहाराष्ट्र'नारायण राणेंना अटक करुनच दाखवा', भाजपाचे ठाकरे सरकारला आव्हान

‘नारायण राणेंना अटक करुनच दाखवा’, भाजपाचे ठाकरे सरकारला आव्हान

Subscribe

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या मुंबईसह कोकण जिल्हा पिंजून काढतायतं. मात्र या यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी शिवसेनेने आता महाड, नाशिक, पुणे आणि औरंगाबादमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलीस नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूनमध्य़े दाखल झाले आहेत. याप्रकरणावरून आता भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. “सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. भाजप नेते नारायण राणे यांची बोलण्याची स्टाईल आहे, अशा एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला पोलीस समज देऊ शकतात किंवा इशारा, पण थेट अटक? हे काय चाललंय? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाणं सोडले आहेत. तर “नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही” असे म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांना ठाकरे सरकारला पुन्हा एकदा नवे आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचं दसऱ्याच भाषण काढा- चंद्रकांत पाटील

सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे. नारायण राणेंनी काही म्हटंल की, काही अधिकार नसताना विधानसभेच्या उपसभापतींना राजकीय स्टेटमेंट देतात पण त्यांना राजकीय स्टेटमेंट देण्याचा अधिकार नाही. पण हे सगळं गुंडाळूनचं ठेवलं आहे. पण निलम गोऱ्हे बोलतात…. विनायक राऊत बोलतात….. केंद्रीय मंत्र्याला थेट अटक? पोलीस समज देऊ शकतात. इशारा देऊ शकतात. पण थेट अटक? म्हणजे सत्तेचा किती दुरुपयोग सुरु आहे. पंढपुरला ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते मोदीजी पंतप्रधान होते. त्यावेळी राणेंना हे चोर म्हटले होते. मग किती गुन्हे दाखल करुया? १००० करुया,…. मुख्यमंत्र्यांचं दसऱ्याचं भाषण काढा. त्यावरून तुमच्या टिव्हीची भाषा बदलेल. उद्धवजींनी मोदींना चोर म्हटले, त्याचं काय कारायचं. विनायक राऊत धुव्वाधार बोलतायतं. विधानपरिषदेचे सभापती कोणत्याही पक्षाचे नसतात. आम्ही यासंदर्भात कोर्टात जाऊ. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते असूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं” असा दावा करत त्यांनी ठाकरे सरकरावर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -

सरकार सूडबुद्धीने काम करतयं – प्रमोद जठार

नारायण राणेंचा दौरा योग्यप्रकारे होणार. अर्ध्या तासानंतर दौऱ्याला चिपळूनमधून सुरुवात होईल. सरकार सूडबुद्धीने काम करतयं. ही सुडबुद्धी किती असावी तर कालच्या दौऱ्यासाठी आम्ही जागा निश्चित करत होतो. त्या जागा मिळण्यासाठीही अडचणी येत होत्या. सरकार हे सुडबुद्धीने बोलतयं, वागतयं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेली ४० वर्षे राहिल्याने राणे साहेबांची ठाकरी भाषा आहे. जर ठाकरी भाषेवरचं गुन्हे दाखल करायचे असतील तर प्रत्येक दसरा मेळाव्यातील ठाकरे मंडळींवरती गुन्हे दाखल करावे लागतील. मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायचे असेल तर ठाकरी भाषेत उत्तर द्यावे. असे थेट आव्हान चिपळूनचे भाजपा जिल्हाअध्यक्ष प्रमोद जठार यांनी केलं आहे.

धास्तावलेल्या सरकारकडून रडीचा खेळ सुरु – राम कदम

महाराष्ट्र सरकारविरोधातील जनतेचा, जनआक्रोश या जन आशीर्वाद यात्रेतून दिसतोय. धास्तावलेल्या सरकारने पहिल्या दिवसापासून रडीचा खेळ सुरु केला. पहिल्याच दिवशी नारायण राणेंचे मुंबईतील बॅनर उतरवले. अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची गर्दी झाली त्यावर एकही एफआयआरची नोंद झाली नाही. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेविरोधात ५० एफआयआर नोंद झाले. त्यामुळे राजकीय सूडापोटी सरकारची ही कारवाई आहे. केंद्रीय मंत्री पदाची गरीमा राखणे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित होते. पण जे सरकार वाझेसारख्या लोकांना हातीशी धरुन रेडकार्ड ठरवलतं त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहे. असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -