घरताज्या घडामोडीNarayan Rane VS Shiv Sena: नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक

Narayan Rane VS Shiv Sena: नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक

Subscribe

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून आंदोलन, पोस्टरबाजी करत आहेत. नाशिकमधील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करून त्याची तोडफोड केली आहे. (shivsena supporters attack nashik bjp office) त्यामुळे सध्या महाराष्ट्रात नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटलेला दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. याप्रकरणी नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या नारायण राणे यांना अटक होते की नाही? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मात्र या दरम्यान नाशिकमधील शिवसैनिकांनी आंदोलन करत एन. डी.पटेल रोडवरील भाजप कार्यालयावर दगडफेक करून त्यांची तोडफोड केली आहे. माध्यमांशी बोलताना शिवसैनिक म्हणाले की, ‘शांत आणि संयमी पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, सर्वांचे जीव सांभाळले. भाजपमध्ये त्यांना मोठं-मोठी पद मिळावीत म्हणून मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी केली जात आहे. भविष्याकाळात मुलाला मंत्रीपद मिळण्यासाठी, प्रसिद्धसाठी उद्धव ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. नारायण राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागवी अशी त्यांनी विनंती केली आहे.’

- Advertisement -

नारायण राणे यांच्या पोस्टरवर केली शाईफेक

नाशिक प्रमाणे सोलापूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरमधील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरवर शाईफेक करून तीव्र निषेध दर्शवला.

- Advertisement -

हेही वाचा – नारायण राणे यांना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -