घरमहाराष्ट्रमाता न तू वैरिणी! मनोरुग्ण मुलीची आईनेच केली हत्या, अंधेरीतील घटना उघडकीस

माता न तू वैरिणी! मनोरुग्ण मुलीची आईनेच केली हत्या, अंधेरीतील घटना उघडकीस

Subscribe

याप्रकरणी अंधेरी पोलीस (Andheri Police) तपास करत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.

अंधेरीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १९ वर्षीय मनोरुग्ण (Mentally ill girl) मुलीचा गळा दाबून जन्मदात्या आईनेच हत्या केली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस (Andheri Police) तपास करत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. (Mentally ill girl was killed by her mother, the incident in Andheri revealed)

हेही वाचा – प्रेमात गेम! प्रेयसीने नदीत उडी मारताच प्रियकर पसार; गुन्हा दाखल

- Advertisement -

अंधेरी येथे एका आईने आपल्या १९ वर्षीय मनोरुग्ण मुलीची हत्या केली. मात्र, या मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव आईने रचला. याप्रकरणी तिने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. या मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. या शवविच्छेदन अहवालात मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी आईकडे याप्रकरणी सखोल चौकशी केली असता आईने हत्येची कबुली दिली.


याप्रकरणी अंधेरी पोलीस सखोल चौकशी करत असून हत्येची कबुली दिलेल्या आईला अटक करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -