घरक्राइमप्रेमात गेम! प्रेयसीने नदीत उडी मारताच प्रियकर पसार; गुन्हा दाखल

प्रेमात गेम! प्रेयसीने नदीत उडी मारताच प्रियकर पसार; गुन्हा दाखल

Subscribe

प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच अशी विचित्र घटना घडली आहे. या घटनेत अशी माहिती समोर आली की, प्रेयसीने प्रियकराविरोधात आत्महत्या न केल्याने एफआयआर दाखल केला आहे

प्रेमात कधी कोणाचा गेम होईल सांगता येत नाही. एकत्र जगण्याच्या आणा-भाका घेणारे प्रेमी युगल एकमेकांविरोधात कधी काय कट रचतील सांगणे कठीण आहे. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून समोर आली आहे. एक प्रेमी युगल एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रयागराजच्या नैनी नदीच्या पुलावर पोहचले. यावेळी दोघांनी एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली. यादरम्यान झालेल्या भांडणात प्रेयसीने नदीच्या पुलावरून उडी मारली, मात्र प्रेयसीने उडी घेताच प्रियकर तेथून पसार झाला. हे नदीत उडीत घेणाऱ्या प्रेयसीच्या लक्षात आले. प्रेयसीने नदीत पोहून आपले प्राण वाचवले आणि पोलीस स्टेशन गाठत प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.

सुदैवाने प्रेयसीला पोहणे येत असल्याने ती नदीच्या काठावर आली, तोपर्यंत प्रियकर घटनास्थळावरून गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले, यामुळे संतप्त प्रेयसीने प्रियकराविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज अन् बदनामीची धमकी; MBA च्या विद्यार्थ्यासह पाच जणांना बेड्या

प्रियकराच्या लग्नामुळे विवाहित प्रेयसी नाराज

32 वर्षीय प्रेयसी ही विवाह असून तिचे 30 वर्षीय अविवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघांमधील प्रेमाचे नाते इतके घट्ट झाले होते की दोघांनी एकमेकांसोबत जगण्या- मरण्याची शपथ घेतली. मात्र ही विवाहित प्रियसी आपल्या मुलांना घेऊन पुण्याला गेल्याने दोघांनी नात्यात दुरावा आला. एकमेकांबद्दलची आपुलकी कमी झाली. याचदरम्यान प्रियकराचे एका मुलीसोबत लग्न झाले. आपल्या प्रियकराने लग्न केल्याची बातमी प्रेयसीला समजली ज्यामुळे ती खूपचं अस्वस्थ झाली. पुण्याहून परताच तिने प्रियकराची भेट घेतली, यावेळी तिने प्रियकराला त्याच्या बायकोसोबत घटस्फोट घेण्यास सांगितले ज्यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

प्रेयसीने प्रियकराला त्याच्या बायकोसोबत घटस्फोट घेत असं सांगत तिच्यासोबत (प्रेयसी) लग्न करण्याची मागणी केली. पण प्रियकराला यात काही रस नव्हता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघांनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने दोघेही प्रयागराजच्या नदी पुलावर पोहोचले. यावेळी प्रेयसीने नदीत उडी मारली, पण प्रियकराने उडी मारलीच नाही. प्रेयसीने उडी मारताच प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला.

- Advertisement -

प्रेयसीचा प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच अशी विचित्र घटना घडली आहे. या घटनेत अशी माहिती समोर आली की, प्रेयसीने प्रियकराविरोधात आत्महत्या न केल्याने एफआयआर दाखल केला आहे. विवाहित प्रेयसीने प्रयागराजमधील कीडगंज पोलिस स्टेशनमध्ये विवाहित प्रियकरावर अनेक गंभीर आरोप करत हा एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी विवाहित प्रेयसीच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न, मोबाईलचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


कोकणात जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात मुलाने केला आईवर कोयत्याने हल्ला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -