घरमहाराष्ट्रजळगावात पारा 43.5 अंशांवर

जळगावात पारा 43.5 अंशांवर

Subscribe

राज्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद

जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. सोमवारी जिल्ह्यातील पारा 43.5 अंशांवर जाऊन पोहोचल्याने राज्यातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. बदलते तापमान, वृक्षतोडीमुळे जळगाव जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. असेच चित्र राहिल्यास तापमान ५० अंशांपर्यंत जाण्याचा धोका आहे. वृक्षतोड थांबवून वृक्षांची संख्या वाढवल्यास जिल्हातील तापमान कमी होऊन निसर्गाचा समतोल राखला जाईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर, जळगाव, सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -