घरताज्या घडामोडीप्रवीण दरेकरांची 3 तास चौकशी

प्रवीण दरेकरांची 3 तास चौकशी

Subscribe

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (मुंबै बँक)च्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सोमवारी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात 3 तास चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. दरेकरांना चौकशासाठी बोलावल्यावर पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करून जोरदार घोषणाबाजी देखील केली.

याप्रकरणी दुपारी 12 वाजता सुरू झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली. पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. मात्र, पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचे प्रत्येक क्षणी जाणवत असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली.

- Advertisement -

१९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांवर दबाव
मुंबईचे पोलीस आयुक्त स्वत: चौकशी मॉनिटर करत होते. त्यामुळे चौकशी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवरील दबाव स्पष्टपणे दिसत होता. माझ्याकडे असलेली माहिती मी त्यांना दिली. हा गुन्हा एका संस्थेपुरताच मर्यादित असताना इतर संस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक आणि अनेक विषयासंदर्भातील नियमबाह्य प्रश्न मला विचारण्यात आले. चौकशी सुरू असताना पोलीस अधिकार्‍यांना 6 ते 7 वेळा फोन आले, हे फोन कुणाचे होते ते कळले नाही. आवश्यकता भासल्यास पुन्हा बोलावू असे त्यांनी सांगितले आहे. पुन्हा बोलावले तर मी त्या ठिकाणी उपलब्ध होईन.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -