घरमहाराष्ट्रबच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Subscribe

बच्चू कडू यांनी मंत्रालयात गृहविभागात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.

अपक्ष आमदार बच्चू कडू आणि त्यांची आंदोलने आपल्याला सर्वांना परिचित आहेतच. मग ते बच्चू कडू यांचे शोले स्टाईल आंदोलन असो वा इतर आंदोलने. त्यांच्या आंदोलनात काही तरी वेगळेपण असते. मात्र आज बच्चू कडू यांनी चक्क मंत्रालयात एंट्री मारत मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागातील अधिकाऱ्यांना झापल्याचे पाहायला मिळाले. मंत्रालयातील सर्वसामान्यांच्या फाईल्स शक्यतो पुढे जात नाहीत, अशी अनेकांची बोंब असते. मात्र आज बच्चू कडू यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागातील फाईल कशा महिनो न महिने धूळखात पडल्या आहेत, याचे वास्तव समोर आणले.

नेमकं झालं तरी काय?

पालघर येथे काही विकासकांनी अवैधरित्या बांधकाम बांधले होते. त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागले. एप्रिलमध्ये या संबधीत पत्र गृह विभागाला देण्यात आले होते. मे मध्ये गुन्हे दाखल झाले पण अटक का होत नाही? हे विचारण्यासाठी जेव्हा बच्चू कडू मंत्रालयात आले, तेव्हा या विभागातील अनेक फाईल धूळ खात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बच्चू कडू यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना झापले आणि फाईल्स पुढे जायला विलंब का लागतो? असा जाब विचारला.

- Advertisement -

अधिकारीच अधिकाऱ्यांना वाचवत आहेत

सेवा हमी कायद्याप्रमाणे कोणतीही फाईल एक ते दोन दिवसांत पुढे गेल्या पाहिजेत. तसेच ७ दिवसांत या फाईलवर उत्तर मिळाले पाहिजे. मात्र, उत्तर सोडा इकडे फाईलच गायब असल्याचे उघडकीस येत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला. सरकारने कायदा आणला पण अंमलबजावणी करणारे अधिकारी तो पायदळी तुडवत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी करत फक्त स्वार्थ असलेल्या फाईल पुढे सरकतात, असे सांगितले. उद्योगपती किंवा विकासकांची फाईल पेंडीग न राहता सर्वसामान्यांच्या फाईल इथे पेंडीग राहतात, असा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे बच्चू कडू यांनी अचानक मारलेल्या एंट्रीमुळे गृह विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -