घरमहाराष्ट्रनागपूरMLA Disqualification : "सुनावणी पूर्ण होण्याआधीच राहुल नार्वेकर...", रोहित पवारांचा खळबळजनक दावा

MLA Disqualification : “सुनावणी पूर्ण होण्याआधीच राहुल नार्वेकर…”, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Subscribe

शिवाजी महाराजांनी सुरत जाऊन सामान्य लोकांना लुटले नव्हते. पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचाराने लुटले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर केली.

नागपूर : राज्य विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. या अधिवेशनात शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी देखील सुरू आहे. सध्या शिंदे गटाची उलटतपासणी सुरू आहे. आतापर्यंत मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि प्रतोद भरत गोगावले यांची उलटतपासणी झाली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी रोहित पवार म्हणाले, “आमदार अपात्रतेची सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. संविधानानुसार निर्णय घेण्याची वेळ आली तर एकनाथ शिंदेंविरोधात निर्णय द्यावा लागेल आणि हा निर्णय घेणे म्हणजे राजकीय आत्महत्याच ठरेल. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षची नेमूक होईपर्यंत सुनावणी पुढे जाईल किंवा सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल.”

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification : भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांचे खडेबोल; “छत्रपती शिवाजी महाराजांचा…”

महाराष्ट्राची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू

“छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये गेले होते म्हणून आम्ही तिकडे गेले, असे विधान भरत गोगावलेंनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीदरम्यान केले. भरत गोगावले यांच्यावर टीका होत आहे. भरत गोगावले यांचे वक्तव्य चुकीचे असून शिवाजी महाराजांनी सुरत जाऊन सामान्य लोकांना लुटले नव्हते. पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचाराने लुटले आहेत. भाजपाचे नेते आता महाराष्ट्राला सुद्धा हुकूमशाहीच्या दिशेने नेहत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर केली.

- Advertisement -

हेही वाचा – Parliament : संसदेत गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन; अमोल शिंदेच्या गावाकडे पोलीस रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; राऊतांची टीका

शिवाजी महाराज सूरतेला गेले होते म्हणून मी सूरतेला गेलो होतो, असे आमदार आपत्रता सुनावणीदरम्यान भरत गोगावले म्हणाले. यावर संजय राऊत म्हणाले, “हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराजा हे सुरतेला गेले होते. ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी गेले होते. तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज सुरतेहून गुवाहाटीला गेले नव्हते. ते सूरतेहून गुवाहाटीला रेडा कापायला गेले नव्हते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -