घरमहाराष्ट्रMLA Disqualification : निर्णय पूर्णपणे राजकीय असेल, कायद्याला धरून नसेल, मात्र त्यानंतर...

MLA Disqualification : निर्णय पूर्णपणे राजकीय असेल, कायद्याला धरून नसेल, मात्र त्यानंतर राजकीय भूकंप येईल – काँग्रेस

Subscribe

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत देणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा नेमका काय निकाल लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर या प्रकरणाचा संपूर्ण निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी या निकालपत्राच्या मसुद्यावर कायदेशीर अभिप्राय घेण्यासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र असे असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सूचक विधान केलं आहे. (MLA Disqualification Case The decision will be purely political not up to the law but political earthquake will follow Congress Pruthviraj Chauhan)

पत्रकार परिषदेत भाजपाच्या राजकीय धोरणावर टीकास्र सोडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने पुढे ढकलल्या आहे. त्यांना हे लक्षात आले आहे की, असंच आपण पुढे गेलो, तर आपलं आता काही खरं नाही. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर असं एकही राज्य नाही, जिथे भाजपाची लोकसभेची संख्या वाढेल. कारण काही राज्यांमध्ये ते सर्वोच्च आकड्यावर आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वाढण्याची शक्यता नाही आणि इतर ठिकाणी राजकीय परिस्थितीमुळे ते वाढणार नाहीत. अशा परिस्थितीमुळे भाजपाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस एक पाऊल मागे; आपसमोर हा ठेवला प्रस्ताव

विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाच्या 23 जागा आहेत आणि आणखी किती वाढवता येतील याबाबत भाजपा विचार करत आहे. जुन्या समीकरणानुसार त्यांच्या 10 जागा आल्या नसत्या. त्यामुळे त्यांनी एकेक प्रयोग केले. पहिला प्रयोग शिवसेनेवर झाला आणि दुसरा प्रयोग राष्ट्रवादीवर झाला. मात्र यानंतरही भाजपाचे प्रयोग थांबायचं नाव घेत नाही आहे. आता त्यांना वाटते आहे की, आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. मात्र भाजपाच्या प्रयोगामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. असे असल्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर आपल्याला निवडणुकीत संधी मिळेल, असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

निर्णय राजकीय असेल, कायद्याला धरून नसेल

शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे पक्षांतरबंदी कायद्याचं 100 टक्के उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घ्यावा लागेल. असे असले तरी ते एका पक्षाचे आमदार आहेत आणि पक्षाच्या हिताविरोधात निर्णय देतील का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी असेही म्हटले की, एक-दोन दिवसांत निर्णय येईळ, मात्र बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. पण जो काही निर्णय होईल, तो पूर्णपणे राजकीय असेल आणि कायद्याला धरून नसेल, अशी शक्याताही पृथ्वीराज  चव्हाण यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का? IPL पूर्वी सूर्यकुमारवर होणार शस्त्रक्रिया

सर्वोच्च न्यायालयाला निर्णय राजकीय भूकंप असेल

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कायद्याला सोडून जर निर्णय झाला, तर सर्वोच्च न्यायालय काय करणार हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरून निर्णय घेईल का? हे पाहावे लागेल. कारण त्यानुसार राजकारणाची बरीच समीकरणं पुन्हा लिहावी लागतील. त्यामुळे 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतरावर काय तो निर्णय होऊ द्या. कारण कुणी म्हणतं राजीनामा देतील, कुणी म्हणतं आजारी पडतील, कुणी म्हणतं वेळ वाढवून मागतील. त्यामुळे त्यांनी जर या प्रकरणातून अंग काढलं आणि निर्णय घेतला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय पहिला राजकीय भूकंप असेल, अशी शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -