घरक्राइमVijay Wadettiwar : पोलीस विभागच आतून पोखरला गेलाय; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

Vijay Wadettiwar : पोलीस विभागच आतून पोखरला गेलाय; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

मुंबईतील नागपाडा मोटर वाहन विभागात चालक असलेल्या आठ महिला पोलीसांच्या सहीचे एक पत्र शुक्रवारपासून समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या पत्रावर आठही महिलांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. आठ महिला पोलिसांनी आरोप केला आहे की, एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक त्यांना सरकारी वाहनातून रुमवर नेऊन वारंवार बलात्कार करत होते.

मुंबई : मुंबईतील नागपाडा मोटर परिवहन विभागात चालक असलेल्या आठ महिला पोलीसांवर एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिला पोलिसांचा छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित महिलांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सरकारवर टीकास्त्र डागलं असून, पोलीस विभागच आतून पोखरला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Vijay Wadettiwar The police department itself has gone inside Vadettivars criticism of the government)

मुंबईतील नागपाडा मोटर वाहन विभागात चालक असलेल्या आठ महिला पोलीसांच्या सहीचे एक पत्र शुक्रवारपासून समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या पत्रावर आठही महिलांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. आठ महिला पोलिसांनी आरोप केला आहे की, एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक त्यांना सरकारी वाहनातून रुमवर नेऊन वारंवार बलात्कार करत होते. या तिघांसोबत एक रायटर, उपायुक्तांचा ऑपरेटर, चालक, ऑर्डली यांनीही महिलांवर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. या महिला पोलीसांना गर्भ राहिल्यानंतर त्यांना गर्भपात करण्यासाठी बळजबरी करण्यात आली. उपायुक्तांच्या आदेशावरुन त्यांना प्रत्येकी सात हजार रुपये देण्यात आले, आणि याची कुठेही वाच्यता करायची नाही, असा दम देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

- Advertisement -

ही बाब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत जाऊन पोहचताच त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X पूर्वीचे ट्वीटरवर पोस्टमध्ये लिहिले की, पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस नायगाव, यांच्या कार्यालयात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस एक पाऊल मागे; आपसमोर हा ठेवला प्रस्ताव

अश्लील शेरेबाजी होणे, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडिओ बनविणे, अश्लील हावभाव करून विनयभंग झाल्याची तक्रार पीडित महिलानी केली आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठांकडे सबंधित पोलिसाची तक्रार केल्यावर त्यावर कारवाई होण्याऐवजी त्या महिलांना मानसिक त्रास देण्यात आल्याची माहितीसुद्धा तक्रारीत करण्यात आली आहे.

हेही वाचा : Ram Mandir : ‘याची देही याची डोळा’ अनुभवणार जगभरातील रामभक्त, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा

राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणत महिला पोलीस आणि महिला कर्मचारी कार्यरत आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल यांचा अंदाज न लावलेला बरा असेही वडेट्टीवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गृहखात्याने आता तरी गांभीर्याने लक्ष्य देण्याची गरज

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पुढे त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, पोलीस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असून, नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे. पोलीस दल, सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे जर महिलेला राज्याच्या विरोधीपक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय हक्कासाठी लढा देण्याची मागणी होत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलीस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे यावरून स्पष्ट होते अशीही टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे.

पोलीस दलात महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने आता तरी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून महिलेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -