घरमहाराष्ट्रST workers strike : शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक...

ST workers strike : शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचाय, पडळकरांचा आरोप

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले जातेय. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचाय” असा आरोप पडळकरांनी केला आहे.

आज भाजपाने सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे संसार मंत्रालयाबाहेर थाटणार असे सरकारला आव्हान केले आहे. यावर गोपीचंद पडळकरांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहत ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, शांततेत सुरु असलेलं आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचा आहे, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या या सर्व कर्मचाऱ्यांना मिळाव्या अशी भावना अनिल परबांची झाली आहे. त्यामुळे अनिल परब कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या डेपोमधून कर्मचारी आंदोलनासाठी निघतायत त्या डेपोमध्ये कर्मचाऱ्यांना रोखले जात आहे. त्यांच्या खाजगी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले जातेय. मुंबईत आंदोलक कर्मचारी पोहचू नये यासाठी सर्व टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त आहेत. असं पडळकर म्हणाले.

- Advertisement -

“२८ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून संप सुरु आहे, आज १० ऑक्टोबर. ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, मात्र यातील ४ जणांचे जीव डॉक्टरांमुळे वाचले आहेत. ३५ लोक किंवा माणूस आत्महत्येचा विचार केव्हा करतो? त्यावर अत्यंत बिकट परिस्थिती आल्याशिवाय तो आत्महत्येचा विचार करत नाही. सरकारची जबाबदारी आहे, कर्मचाऱ्यांना आधार देणे, कर्मचाऱ्यांना आत्महत्येच्या विचारांपासून बाजूला करणे, मात्र हे सरकार या कर्मचाऱ्यांवरचं कारवाईचा बडगा उगारत आहे. यातून ठाकरे सरकारचा चेहरा उघड झाला आहे की महाराष्ट्रातील मराठी कर्मचाऱ्यांप्रती यांना कसलीही, कुठलीही आपुलकी राहिलेली नाही. बडतर्फच्या नोटीस दिल्या, उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करु अशी मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना धमकी दिली आहे. असंही पडळकर यांनी सांगितले.


ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, सदाभाऊ खोत घटनास्थळी, पोलिसांकडून अडवणूक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -