घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

Subscribe

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बनावट नोटांचं रॅकेट चालवत होते असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीसांवर हायड्रोजन बॉम्ब टाकला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायोड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं जाहीर केलं होतं.

दरम्यान, आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतकवाद, काळं धन संपणार, तसंच, मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा आहेत त्या संपवण्यासाठी नोटबंदी करतोय, असं सांगितलं होतं. नोटबंदी नंतर २०००, ५०० च्या खोट्या नोटा सापडल्या. ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत एकही महाराष्ट्रात खोट्या नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ ला महसूल गुप्तचर संचालनालयाने बीकेसीमध्ये एक छापेमारी केली. यात १४ कोटी ५६ लाख बनावट नोटा पकडल्या गेल्या. ते प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला. यामध्ये मुंबईमध्ये एकाला अटक, पुण्यात अटक इम्रान आलम शेख, रीयाज शेख याला अटक झाली.

- Advertisement -

कारवाईत ८ लाख ८० हजार सापडल्याचं सांगून हे प्रकरण दाबण्यात आले. पाकीस्तानच्या खोट्या नोटा चालण्यासाठी रॅकेट चालवणाऱ्यांना अटक होते आणि काही दिवसात जामीन होतो. हे प्रकरण एनआयएला दिलं नाही. नोट कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण जे बनावट नोटांचं रॅकेट चालवत होते त्यांना तत्कालीन सरकारचा पाठिंबा होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. गोष्ट सांगण्यात आली की काँग्रेसचा नेता आहे, या शहरात तो काँग्रेसचा कधी नेता नव्हता. जर रॅकेटमधअये सापडले तर काँग्रेसवर बील फाडा, असा कट होता.

या रॅकेटमध्ये इम्रान आलम शेख याला पकडण्यात आलं. इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेख यांचा छोटा भाऊ आहे. हाजी अरफात शेख यांना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात घेऊन अल्पसंख्याक आयोगचा अध्यक्ष केलं, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -