घरमहाराष्ट्रअजित पवार आणि अमित शाह यांची दिल्लीतील बैठक नियोजित; आमदार संजय शिरसाटांचा...

अजित पवार आणि अमित शाह यांची दिल्लीतील बैठक नियोजित; आमदार संजय शिरसाटांचा दावा

Subscribe

अजित पवार आणि अमित शाह यांची दिल्लीतील बैठक नियोजित असल्याचं विधान आमदार संजय शिरसाठ यांनी केलंय. त्यामुळे मविआत लवकरच मोठी घडामोड घडण्याचे संकेत दिसून येत आहेत.

महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. अजित पवार नाराज आहे, नॉटरिचेबल आहेत, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता याच चर्चांमध्ये भर म्हणून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी मोठा दावा केलाय. अजित पवार आणि अमित शाह यांची दिल्लीतील बैठक नियोजित असल्याचं विधान आमदार संजय शिरसाठ यांनी केलंय. त्यामुळे मविआत लवकरच मोठी घडामोड घडण्याचे संकेत दिसून येत आहेत.

महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा सध्या करण्यात येतोय. यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठी यांनी मोठं विधान केलंय. यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बोलावून स्पष्ट इशारा दिला असावा. दीड तासांची बैठक केवळ चहापाणी करून किंवा एखादं वाक्य विचारून होत नसते. कोणत्याही सोबतीशिवाय राष्ट्रवादी राहत नाही, हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं वैशिष्ट्य आहे. मग त्यासाठी कुणाबरोबरही युती झालेली त्यांना चालते. त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर रहायचं नाही. याला पर्याय म्हणून त्यांचा कल भाजपकडे जाणार असं चित्र दिसतंय.”

- Advertisement -

तसंच भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत जाईलही, परंतू आताच्या परिस्थितीत भाजपसोबत जाणं राष्ट्रवादीसाठी योग्य ठरणार नाही. लोक पुन्हा आपल्याला गद्दार म्हणतील की काय, असा संभ्रम त्यांच्या मनात आहे. म्हणून भाजपसोबत ते प्रत्यक्ष न जाता त्यांची काही माणसं गेली तरी त्यांना हरकत नाही. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांवर कोणतीही कारवाई न करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. कारण याला शरद पवारांची मुखसमंती आहे. त्यामुळे उद्या भविष्यात राष्ट्रवादी भाजपबरोबर गेली तर यात काही नवल नाही.”, असं भाकित यावेळी संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय.

भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आली तर शिंदे गटाच्या शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत संजय शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, “राष्ट्रवादीला सद्या त्यांची कातडी वाचवायची आहे. त्यांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे. अजित पवार हे ईडी प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे, असं सांगतात. त्यांच्या अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, मग त्यांना भीती नाही का? अजित पवारांनाच भीती आहे का फक्त? असा सवाल देखील यावेळी संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. जे सत्तेत आहेत त्यांचा पाठीराखा बनून राष्ट्रवादीला रहायचं आहे. ते प्रत्यक्ष सत्तेत येणार नाहीत, पण पाठीराखा म्हणून राहतील. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही, मग भाजपनं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.”, असं देखील संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

यावेळी संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष आहे. कधी कुणाचा घात करेल सांगता येत नाही. शरद पवारांचा तो स्वभाव आहे. म्हणून राष्ट्रवादीबरोबर आम्ही कधीच राहणार नाही. भाजपनं जरी राष्ट्रवादीला सोबत घेतलं तरी ते फक्त पाठीराखा म्हणून राहतील, प्रत्यक्ष सत्तेत सोबत राहणार नाही. कारण हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही. मविआमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा त्रास होता या हेतूने आम्ही बाहेर पडलो, लोकांच्या मतांच्या आधारेच आम्ही मविआमधून बाहेर पडलो. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही, असं मत यावेळी संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.

जर राष्टवादी भाजपसोबत आली तर शिंदे गटाचं काय यावर प्रश्न उपस्थित केले असता संजय शिरसाट यांनी थेट आव्हानच दिलं. “राष्ट्रवादीला आधी भाजपबरोबर येऊ तर द्या, मग पाहू काय करतात ते, राष्ट्रवादीमध्ये आता अस्वस्थता आहे. भविष्यात त्यांचं काही होणार नाही, हे चित्र त्यांना आता दिसू लागलंय. याचाच एक भाग म्हणून आजच्या सभेनंतरची होणारी फूट ही आघाडीची बिघाडी होण्यास कारणीभूत ठरणार आहे.” असं म्हणत संजय शिरसाट यांनी येणाऱ्या राजकीय घडामोडीचे संकेतही दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -