घरदेश-विदेशप्रसिद्धीसाठी अतिक आणि अशरफची हत्या केली; तिन्ही आरोपींची एसटीएफसमोर कबुली

प्रसिद्धीसाठी अतिक आणि अशरफची हत्या केली; तिन्ही आरोपींची एसटीएफसमोर कबुली

Subscribe

नवी दिल्ली : प्रयागराजमधील माफिया आणि राजकारणी अतिक अहमद (atiq ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ (ashraf) यांची शनिवारी (15 एप्रिल) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींनी पोलिसांसोबतच एसटीएफ टीमसमोर चौकशी सुरू आहे. यावेळी या तिन्ही आरोपींनी प्रसिद्ध होण्यासाठी अतिक आणि अशरफची हत्या केल्याचे मान्य केले आहे. (All the three accused have confessed to killing Atiq and Ashraf to become famous)

हेही वाचा – अतिकच्या हत्येनंतर भाजप नेत्याचे ट्वीट चर्चेत; त्यांनी वर्तवलेली शक्यता…

- Advertisement -

अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा शूटर साथीदार गुलाम यांचा यूपीच्या झाशीमध्ये दोन दिवसांपूर्वीच एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयाजवळ वैद्यकीय तपासणीसाठी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार सुरू झाला, त्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणारे तिघे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते. त्यांच्याकडे माध्यमांचा बूम आणि कॅमेरा होता. या तिघांनी गोळीबार केल्यानंतर लगेचच आत्मसमर्पण केले. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, अतीक-अश्रफ टोळीचा पूर्णपणे नायनाट करून स्वत:चे नाव कमावण्याच्या उद्देशाने या दोघांची हत्या केली.

हेही वाचा – योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा फोलपणा; एन्काऊंटर प्रकरणी सपा आणि एमआयएमची टीका

- Advertisement -

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी पोलिसांना सांगितले की, अतिक आणि अशरफ यांना पोलीस कोठडीत घेतल्याची माहिती मिळताच आम्ही स्थानिक पत्रकार असल्याचे भासवून जमावात सामील होऊन त्यांना ठार मारण्याचा कट रचला होता. सध्या तिन्ही हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केले आहे. प्रमुख सार्वजनिक आस्थापना आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अतिक अहमद हा 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये बसपा नेत्याच्या हत्येतील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येतील तो मुख्य आरोपी होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -