घरताज्या घडामोडीसंभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंना वेगळे आसन आणि आता नागपूरच्या सभेत त्यांची खुर्ची...

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंना वेगळे आसन आणि आता नागपूरच्या सभेत त्यांची खुर्ची…

Subscribe

महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवरुन जोरदार राजकारण झाले. मात्र आज नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमुठ सभेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या खुर्च्या एकसारख्याच ठेवण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही जाहीर आणि विराट सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे या ‘महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणानंतर मविआची सर्व सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती जाणार का? अशी चर्चा रंगली होती. कारण या सभेत उद्धव ठाकरे यांच्याशी विशेष खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खूर्ची आणि ‘मविआ’ची सर्व सूत्रे उद्धव ठाकरेंच्या हाती जाणार का? या वृत्ताला दुजोरा दिला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Vajramuth meeting to be held in Nagpur the chairs of uddhav thackeray Maha Vikas Aghadi kept the same vvp96)

नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज पार पडणार आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या सभेत भाषण करणार आहेत. या सभेपूर्वी येथील स्थानिकांकडूनया सभेला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. परंतु, अखेर पोलिसांच्या परवानगीनंतर दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर मैदानावर सभा होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सभेच्या तयारीदरम्यान आसनव्यवस्था कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

- Advertisement -

नागपूरच्या वज्रमुठ सभेनिमित्त व्यासपीठावर असणाऱ्या शिवसेना (उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसाठी एकसारख्याच खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. काळ्यारंगाच्या एकसारख्या खुर्चा आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही इतर नेत्यांप्रमाणेच खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही खुर्ची ऐनवेळी बदलण्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांच्या आघाडीने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या मंचावर सर्व नेत्यांसाठी अशाच खुर्च्या अपेक्षित होत्या.अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना अतिरिक्त महत्त्व देत विशेष खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे ही गोष्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.

- Advertisement -

हेही वाचा – मविआच्या नागपूरमधील वज्रमुठ सभेला अशोक चव्हाण राहणार गैरहजार; नेमकं कारण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -