घरमहाराष्ट्रपुणेकरांची करवसुली थांबवा; राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

पुणेकरांची करवसुली थांबवा; राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

Subscribe

पुणे महापालिकेकडून शहरातील नागरिकांना अचानक मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र ही करवसुली थांबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. याबाबतचे पत्र मनसेने आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर प्रसिद्ध केले आहे.

या ट्विटमध्ये लिहिण्यात आले की, पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पुणेकरांना धाडल्या. १९७० च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मूल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. २०१९ ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली? तूर्तास ह्या निर्णयाला स्थगिती दिलेली असली तरी, ह्यावर कायम स्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा ही मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

- Advertisement -

तसंच राज्यातील गोरगरीब जनतेला, दुर्गम भागातील जनतेच्या विविध आरोग्य तपासण्या अत्यल्प दरांत उपलब्ध करून देण्यासाठीच्या एका तंत्रज्ञानाचं सादरीकरण देखील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीसमोर करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीकारक ठरणारी एक मशीन घेऊन राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहचले. हेल्थ नोवो या कंपनीची ही हेल्थ एटीएम मशीन आहे. रक्त चाचणी करणारी ही अत्याधुनिक मशीन आहे. 140 वेगवेगळ्या टेस्ट या मशीनच्या माध्यमातून केल्या जातात ज्यामुळे पाच ते दहा मिनिटात रिझल्ट माहित पडतो. महाराष्ट्रातील नागरिकांना फायदेशीर ही पोर्टेबल मशीन कुठेही घेऊन जात येते. याचे चार्जिंग सात ते आठ तास चालते. एकावेळी चार टेस्ट करता येणाऱ्या या मशीनचा मोठा फायदा खेडेगावातील नागरिकांना होईल, अशी माहिती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे.


गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रकल्प एक मात्र फायदे अनेक; पश्चिम व पूर्व उपनगर वाहतूक होणार सुलभ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -