घरमहाराष्ट्रParliament Security Breach : व्यवस्थेला कोण आणि कशी शिक्षा करणार? आव्हाडांचा सवाल

Parliament Security Breach : व्यवस्थेला कोण आणि कशी शिक्षा करणार? आव्हाडांचा सवाल

Subscribe

मुंबई : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी घुसखोरी करत स्मोक कॅंडल फेकले. यातील एक तरुण महाराष्ट्रातील आहे. त्याला लष्कर किंवा पोलीस सेवेत भरती व्हायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे हे स्वप्न धुसर होत गेले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, व्यवस्थेकडे बोट दाखत या व्यवस्थेला कोण आणि कशी शिक्षा करणार, असा प्रश्न केला आहे.

हेही वाचा – BJP’s CM : भाजपाचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र हेच…, ठाकरे गटाची खोचक टिप्पणी

- Advertisement -

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून काल, बुधवारी लोकसभेत दोघांनी गॅलेरीतून उडी घेत घुसखोरी केली आणि स्मोक कॅंडल फेकले. यामुळे सुरुवातीला सभागृहातील खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण नंतर लगेचच या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन हे दोघेही संसदेत आले होते, असे सांगण्यात येते. यातील एक तरुण मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील असून, त्याचे नाव अमोल शिंदे आहे.

अमोल शिंदेला लष्कर किंवा पोलीस सेवेत भरती व्हायचे होते. नोकरी करण्यापेक्षा तो पोलिसांत भरती होण्यासाठी जास्त प्रयत्नशील होता. त्यासाठी तो फिटही होता. अमोल धावण्यात चांगला होता आणि काही स्पर्धांमध्ये त्याने पहिला क्रमांक देखील मिळविला आहे. पोलीस निवड परीक्षेला जात असल्याचे सांगून तो 9 डिसेंबर रोजी दिल्लीला निघाला होता, अशी माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – BJP & Congress : काँग्रेसने ‘या’ घडामोडींकडे डोळसपणे पाहण्याची गरज, ठाकरे गटाचा सल्ला

पोलीस सेवेच्या अभ्यासासाठी आणि तयारीसाठी त्याने दरमहा 4 हजार रुपये मागितले होते, पण आई-वडील हे दोघेही शेतमजूर असल्याने एवढे पैसे त्याला देणे शक्य नव्हते. पोलीस निवडीसाठी लाखो रुपये खर्च होतील, असे तो सांगायचा, असे अमोलचे वडील म्हणाले. माझे वय वाढत असून अद्याप मी पोलीस सेवेत भरती होऊ शकलो नाही, अशी खंतही तो कधी कधी व्यक्त करायचा.

राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही, हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो, असे सांगून ते म्हणाले की, त्यासोबतच ज्या तरुणाने हे कृत्य केले तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी.

हेही वाचा – Ajit Pawar : “पीएचडी करून काय दिवे लावणार?”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल

आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्षं नोकरीसाठी धडपडतोय, असे आई-वडील सांगतात. खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसांत भरती होता आले नाही आणि काही लोक लाखभर रूपये भरून भरती होतात. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसे करणार? आज अमोलने जो गुन्हा केला आहे, त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल. मात्र, ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडले, त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार? असे सवाल त्यांनी केले आहेत.

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्या; आशिष शेलार यांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -