घरमहाराष्ट्र#MeToo : पुण्यातल्या शिक्षकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लाघ्य कृत्य

#MeToo : पुण्यातल्या शिक्षकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लाघ्य कृत्य

Subscribe

पुण्यातील शिक्षकाचा अश्लाघ्य प्रकार. निगडी पोलिसांनी केली अटक

भारतात सध्या #MeToo चळवळ जोर धरू लागली आहे. चित्रपटसृष्टी, मीडिया, राजकारण अशा क्षेत्रांमधून रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राततही #MeToo सारख्या घटना घडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी येथील किर्ती विद्यालयातील एका शिक्षकाने गुरु या प्रतिमेला लाजवेल असे कृत्य केले आहे.

फिरायला जायचे काय! असे म्हणत शिक्षकाने विद्यार्थीनीचा हात धरून वियनभंग केला. हा धक्कादायक प्रकार निगडीतील किर्ती विद्यालयात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर (५१) याला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी १५ वर्षीय विद्यार्थीनीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी निगडी, प्राधिकरणातील किर्ती विद्यालयात शिकत आहे.

- Advertisement -

एक महिन्यापूर्वी फिर्यादी ही आरोपी काळभोर याच्या केबिनमध्ये संरक्षणशास्त्र व्यवसाय या विषयाची वही कधी जमा करायची आहे, असे विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी काळभोर याने इतर मुलींची वही जमा आहे, ‘तू महिना अखेरला मला एकटी येऊन भेट, तू माझ्यावर प्रेम करतेस काय? तू माझ्याशी लग्न करतेस का? तुला पैशाची गरज आहे का? फिरायला जायचे काय’ असे म्हणाला.

मुंबईच्या एसएनडीटीमध्ये देखील अत्याचार

जुहू येथील एसएनडीटी वसतीगृहात एका महिला वॉर्डनने एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वसतिगृहातील मुलींनी हा आरोप लावला असून वॉर्डनच्या विरोधात आंदोलन देखील केले आहे. एका विद्यार्थीनीने वैद्यकिय कारणास्तव तोकडे कपडे घातले म्हणून सदर वॉर्डनने तिला कपडे काढण्यास लावले, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने देखील मुंबईतल्या शिक्षणवर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -