घरमहाराष्ट्रहुश्श ! आला बुवा एकदाचा...

हुश्श ! आला बुवा एकदाचा…

Subscribe

पावसाची दमदार हजेरी

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देऊन मेटाकुटीस आणणार्‍या पावसाने गुरूवारी बहुतांश जिल्हा व्यापल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे सर्वांकडून ‘आला बुवा एकदाचा’ अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली आहे. या पावसाने खर्‍या अर्थाने मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. पावसाने हवेत गारवा आल्याने उष्म्याने त्रस्त झालेल्या रायगडकरांना दिलासा मिळाला.

७ जून आणि मान्सूनचे आगमन हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून मोडीत निघाले आहे. पाऊस कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात. याही वर्षी पावसाने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. जून महिना सरत आला तरी तुरळक सरी वगळता पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरीही धास्तावला होता. अनेकांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सगळ्यांना खूश केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई असल्यामुळे नागरिक त्रासून गेले होते. आता मान्सून सुरू झाल्यामुळे ही टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. मुरुड, श्रीवर्धन या समुद्रपट्ट्यातही मुसळधार पाऊस कोसळला. या पावसापुढे महावितरणच्या यंत्रणेने बर्‍याच ठिकाणी नांगी टाकली. त्यामुळे लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज खंडित होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला काहीसा ‘ब्रेक’ लागला होता. सायंकाळी शाळेतून घरी परतणार्‍या विद्यार्थ्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली, तसेच अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -