घरमहाराष्ट्रनाशिकभाजपात मोठे फेरबदल; सभागृहनेतेपदी सतीश सोनवणे, गटनेतेपदी जगदीश पाटील

भाजपात मोठे फेरबदल; सभागृहनेतेपदी सतीश सोनवणे, गटनेतेपदी जगदीश पाटील

Subscribe

सत्ताधारी भाजपविरोधात महासभेच्या सभागृहातील ठिय्या आंदोलन सभागृहनेते दिनकर पाटील यांना महागात पडल्याची चर्चा.

धार्मिक स्थळे, मिळकतींचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपविरोधात महासभेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन करणे सभागृहनेते दिनकर पाटील यांना महागात पडले असून, अखेर त्यांची गच्छंती करण्यात आली. त्यांच्या जागेवर आता नगरसेवक सतीश सोनवणे यांची, तर भाजपच्या गटनेतेपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये झालेले हे अंतर्गत फेरबदल मोठ्या राजकीय घडामोडींना वाट मोकळी करून देतील. सभागृहनेतेपदाची नियुक्ती करताना ते डोईजड होणार नाही, अशाच सदस्यांच्या शोधात वरिष्ठ असल्याचे सांगितले जाते आहे. त्यात सतीश सोनवणे हे नाव चपखल बसलयाचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सोनवणे आणि पाटील हे दोघेही शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांची नावे पुढे आल्याचे सांगितले जाते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -