घरताज्या घडामोडीमाझ्यामागे ईडीचा ससेमीरा लावला, पत्राबाबत प्रताप सरनाईक यांचा खुलासा

माझ्यामागे ईडीचा ससेमीरा लावला, पत्राबाबत प्रताप सरनाईक यांचा खुलासा

Subscribe

पत्र लिहिले यामध्ये काही चूक केली नाही

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात खळबळजनक आरोप केले होते. या पत्रानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय, विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावली आहे. प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की, देशामध्ये कुठल्याही ठिकाणी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कुणी आरोपही केला नाही. एमएमआरडीएच्या बाबतीत जो आरोप करण्यात आला होता त्यामध्ये एमएमआरडीएनं जबाब नोंदवला आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. परंतु त्यानंतर मीरा भाईंदर महानगपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांनी जो भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून पर्यावरणाचा ऱ्हास करुन केली होती त्याच्याविरोधात आवाज उठवला, गृहमंत्र्यांना पत्र दिले म्हणून किरीट सोमैय्या यांनी माझ्याविरोधात आंदोलन केलं.

मी काही, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या नाही आहे देश सोडून पळून जायला. आरोप करताना विरोधकांनी कौटूंबिक अवस्था बघितली पाहिजे. माझ्यावर करण्यात आलेली ह्रदयासंबंधी शस्त्रक्रिया, पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहे, कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला होता यामुळे काही दिवस माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मी शिवसेनेचा आमदार म्हणून वेळोवेळी निवडून आलो आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामं करण्यात मी कटिबद्ध असून काम करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राविषयी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी तसेच शिवसेना पक्षप्रमुखांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या अर्णब गोस्वामीच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला, अन्वय नाईक प्रकरण विधीमंडळात आवाज उठवला त्याविरोधात कारवाई सुरु केली, कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यामुळे तिच्याविरोधात हक्कभंग दाखल केला त्यामुळे विरोधकांकडून मी टार्गेट झालो. माझ्याविरोधात कुठेही आरोप, तक्रार, गुन्ह्याची नोंद नसताना माझ्यामागे ईडीचा ससेमीरा लावला गेला. आरोप झाले त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयानं मला संरक्षण दिले परंतु कौटुंबिक कारणांमुळे समोर आलो नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

पत्र लिहिले यामध्ये काही चूक केली नाही

महाविकास आघाडीवर आरोप केले जात होते त्यावेळी एकच ठरवलं की, पक्षप्रमुखांच्या सोबत ठामपणे उभं राहायचे आणि आरोपांना उत्तर द्यायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा माझ्या आणि कुटुंबीयांच्या मागे उभे राहतील असे वाटले परंतु तसे झाले नाही यामुळे पक्ष लिहिले होते. पत्र लिहिल्यामुळे काही चुकीचं केलं नसल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -