घरताज्या घडामोडीअनिल देशमुख आजही ED चौकशीला सामोरे जाणार नाहीत, वकील इंद्रपाल सिंग यांची...

अनिल देशमुख आजही ED चौकशीला सामोरे जाणार नाहीत, वकील इंद्रपाल सिंग यांची माहिती

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून (ED issues summons) तिसऱ्यांदा समन्स (summons) बजावण्यात आला असून आज ५ जुलैला देशमुख यांना ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख आजही ईडी चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी ईडीच्या समन्सला उत्तर पाठविले आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीस हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाची माहिती दिली आणि कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यासही सांगितले आहे. शनिवारी ईडीने त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितले होते.

ईडीच्या समन्सला उत्तर देताना अनिल देशमुख यांच्या वतीने असे सांगितले गेले की, त्यांनी ईडीकडे जे उत्तर मागितले आहे ते ईडीकडून त्यांना दिले गेले नाही. यासह त्यांच्यावर कोणत्या आधारावर कारवाई केली जात आहे हे त्यांना सांगण्यात आले नाही. याशिवाय त्यांनी आपली प्रकृती आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण सांगत ईडीसमोर न येण्याचे कारण सांगितले आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले, त्यांची प्रकृती ठीक नाही. म्हणून ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत. शनिवारी ईडीने अनिल देशमुख यांना हे तिसरे समन्स पाठवले होते. यापूर्वी ईडीने दोन समन्स पाठवले होते. हे दोन्ही समन्स पाठवूनही देशमुख ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी आजारपण, वय आणि कोरोना असल्याचे कारण सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीची चौकशी करण्याची विनंती केली होती आणि आठ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. परंतु आज हा आठ दिवसांचा अतिरिक्त कालावधी आज संपत आहे.

- Advertisement -

दरम्यान, रविवारी अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी असे सांगितले की, अनिल देशमुख ईडीच्या कारवाईपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अनिल देशमुख यांचे वकील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत अशी मागणी केली गेली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना आज ईडीसमोर हजर राहायचे होते.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -