घरमहाराष्ट्रमंत्र्यांना कपडे काढून ठोकून काढा - राजू शेट्टीची जीभ घसरली

मंत्र्यांना कपडे काढून ठोकून काढा – राजू शेट्टीची जीभ घसरली

Subscribe

खासदार राजू शेट्टी यांनी मंत्र्यांना तुडवून तुडवून मारण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीन-कापूस शेतकरी मेळाव्याचे आंदोलन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान त्यांनी असे वादग्रस्त विधान केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्र्यांना मारण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ‘मंत्र्यांना कपडे काढून ठोकून काढा, तुडवून-तुडवून मारा, पोलीसही काहीच करणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीन-कापूस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान राजू शेट्टी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

राजू शेट्टी यांचे विधान

गावातून, जिल्ह्यातून मिरवणाऱ्या, भाषणबाजी करून खोटं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे. नुसतं ठोकलं नाही पाहिजे तर तुडवून-तुडवून मारलं पाहिजे, असे राजू शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले.

- Advertisement -

१९ तारखेला विदर्भात होणार तीव्र आंदोलन

दुष्काळामुळे शेतीसाठी पुरेसे पाणी नाही आणि त्यामुळे पिके करपून जात आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेतकरी या दुष्काळात होरपळून गेला आहे. शेतीसाठी, बि-बियांनासाठी लागणारा खर्च हा शेतकऱ्यांच्या अवक्याबाहेर आहे. तरिही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे राजू शेट्टी आता सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. शासनाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच १९ ऑक्टोबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात आंदोलन करणार, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. महात्मा गांधींना नावे ठेवणारे आज सत्तेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे. पण शासनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १९ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -