घरताज्या घडामोडीदेश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा आणि निवडणुका घ्यायच्या हाच भाजपाचा डाव - संजय...

देश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा आणि निवडणुका घ्यायच्या हाच भाजपाचा डाव – संजय राऊत

Subscribe

ठाकरे गटाचे खासजार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या दंगलीवरून भाजपावर निशाणा साधला. "दंगलखोर कोण होते आणि देशात दंगली कोण घडवतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे.

‘2024पर्यंत हा देश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं किंवा निवडणुका पुढे ढकलायच्या अशाप्रकारचे यांचे धोरण दिसतंय’, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. (MP Sanjay Raut Slams BJP On Violence In Maharashtra)

ठाकरे गटाचे खासजार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या दंगलीवरून भाजपावर निशाणा साधला. “दंगलखोर कोण होते आणि देशात दंगली कोण घडवतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. काल हुबळीला दंगल कोणी घडवली? हावड्याला दंगली कोणी घडवतंय? महाराष्ट्रात कोण दंगली घडवतंय? भारतीय जनता पक्षाने एक नवीन विंग निर्माण केली आहे, फक्त दंगली घडवायच्या.. निवडणुकांच्या आधी… 2024पर्यंत हा देश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं किंवा निवडणुका पुढे ढकलायच्या अशाप्रकारचे यांचे धोरण दिसतंय”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ही डिग्री खरी आहे का खोटी? हे पंतप्रधानांनीच सांगावं; संजय राऊतांचा हल्लाबोल

“पश्चिम बंगालमध्ये जो हल्ला झाला तो भाजपानेचे घडवला होता. लोकसभा निवडणूक हेच त्यांचे टार्गेट आहे. तसेच, काही जागा ते टार्गेट करू इच्छितात आणि त्यासाठीच हिंसाचार घडत आहे. प्रभू रामाचा जन्मोस्तव हे हिसाचाराचे कारण ठरू शकत का? हे सतत घडत आहेत. हे ज्या राज्यात घडत आहे, जिथे निवडणुका आहेत, किंवा जिथे भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्रात होत आहेत, कारण महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कमजोर आहे”, असेही संजय राऊत म्हणाले

- Advertisement -

“येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा सुफडा साफ होईल, त्यामुळेच त्यांनी राज्यात दंगली घडवल्या. कर्नाटकात निवडणुका होणार आहेत, तिकडेही त्यांनी दंगली घडवल्या. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक भाजपा पराभूत होणार आहे, म्हणून तिकडेही दंगली घडवल्या जात आहेत. जिकडे-जिकडे भाजपाला भीती आहे, तिकडे दंगली घडवल्या जात आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर संजय राऊतांची सारवासारव; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -