घरमहाराष्ट्रअखेर खासदार उदयनराजे न्यायालयात शरण

अखेर खासदार उदयनराजे न्यायालयात शरण

Subscribe

सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात दारुच्या दुकानावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे समर्थकांसह आमनेसामने आले होते. या प्रकरणी दोन्ही राजे आणि त्यांच्या समर्थकांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी खासदार उदयनराजे सुमारे २५ समर्थकांसह जिल्हा न्यायालयात हजर झाले. दस्तुरखुद्द राजे न्यायालयात शरण आल्याने पोलिसांची धावपळ उडाली. या प्रकरणी उदयनराजे यांना दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाला आहे. दोन्ही राजांच्या २५ समर्थकांनाही जामीन मंजूर झाला आहे.

प्रकरण जाणून घ्या – दारुच्या दुकानासमोर साताऱ्याचे ‘राजे’ भिडले, गुन्हा दाखल

जुना मोटर स्टँड येथील दारूच्या दुकानावरील कथित कारवाईच्या संदर्भात सोमवारी दुपारी खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे हे कार्यकर्त्यांसह आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. गेल्या वर्षी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री ‘सुरुची’ बंगल्यावर झालेल्या राड्याची आठवण अनेकांना आली. त्याच घटनेची पुनरावृत्ती होणार का? अशी भीती सातार्‍यातील जनतेला होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी दोन्ही राजे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार दिली. त्यानंतर शिवेंद्रराजे समर्थक रवी ढोणे यांनी उदयनराजे आणि त्यांच्या काही समर्थकांवर जीवे मारण्याची धमकी देणे, दमदाटी-गर्दी, मारामारी करणे, अशा आरोपांखाली तक्रार दिली आहे.

- Advertisement -
उदयनराजे म्हणतात, कोण कुणाला आडवं करतंय बघू

सातार्‍यात सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी खासदार आणि आमदार गटातील संशयितांनी पोलीस ठाण्यात हजर राहून अटक करुन घेतली. त्यातील काहींना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर या दोन्ही गुन्ह्यांमध्ये उदयनराजे हे काही समर्थकांसह जिल्हा न्यायालयात हजर राहिले. त्यामुळे न्यायालयात बघ्यांची गर्दी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. संदेश कुंजीर, अ‍ॅड. अंकुश जाधव व अ‍ॅड. मंदार तातोडकर यांनी काम पाहिले.

उदयनराजे, नगरसेवक किशोर शिंदे, इर्शाद बागवान, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, पद्माकर खुटाळे, महेश शिंदे, मयूर चिकणे, विक्रम शेंडे, केदार राजेशिर्के, सूरज अवघडे, सुनील भोसले, सुहास रणदिवे, मनोज बडेकर, गणेश जाधव, संदीप शिंदे यांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गर्दी, मारामारी करणे या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे गटातील नगरसेवक रवी ढोणे, योगेश चोरगे, वीरेंद्र ढोणे, गजेंद्र ढोणे, विजय देशमुख, अक्षय कांबळे यांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. खा. उदयनराजे व त्यांच्या काही समर्थकांवर दोन तर आ. शिवेंद्रराजे आणि त्यांच्या समर्थकांवर एकच गुन्हा दाखल आहे.

हे वाचा – ‘फक्त फसवू नका’, उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -