घरदेश-विदेशशबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

Subscribe

केरळमधील सबरीमाला मंदिर महिला प्रवेशावरुन झालेल्या वाद आणि हिंसाचार प्रकरणी ४५० गुन्हे दाखल करण्यात आले तर २०६१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला झुगारुन मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात आला नाही. शबरीमाला मंदिर मासिक पुजेसाठी खुले करण्यात आले होते त्यावेळी अनेक महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना विरोध करण्यात आला. त्यावेळा झालेला वाद आणि हिंसाचार प्रकरणी ४५० गुन्हे दाखल करण्यात आले तर २०६१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांनी सांगितले की, याप्रकरणात हिंसाचार पसरवणाऱ्या अनेक लोकांची ओळख पटली नाही. जर कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जर आणखी अटक करावी लागली तर केली जाईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महिलांना मंदिरात प्रवेशासाठी प्रयत्न करणार

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देखील अनेक महिला भक्तांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करुन दिला नाही. डीजीपी लोकनाथ बेहरा यांच्या मते, पोलिसांच्या सुरक्षितेत महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी पोलीस कमिटीकडून अहवाल मागवला आहे. महिलांना मंदिरात कशाप्रकारे प्रवेश देता येईल यासाठी आम्ही एक मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील.

- Advertisement -

अजूनही वाद सुरुच

शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही मोठा वाद निर्माण झाला असून हा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. पाच दिवसाच्या मासिक पूजेनंतर सोमवारी मंदिर बंद करण्यात आले आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात दर्शन घेण्यास मनाई केली गेली. शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यापुढे मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

८०० वर्षापासून सुरु आहे परंपरा

शबरीमाला मंदिरामध्ये भगवान अयप्पाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असे मानले जाते की, भगवान अयप्पा हे ब्रम्हचारी होते. असामध्ये तिथे मासिक पाळी येणाऱ्या म्हणजे १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेशाला बंदी आहे. ही परंपरा गेल्या ८०० वर्षापासून जपली जात आहे.

संबंधित बातम्या –

शबरीमाला मंदिराची ८०० वर्षांची परंपरा मोडता मोडता राहिली

‘सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांवर RSS च्या कार्यकर्त्यांचा हल्ला’

शबरीमाला मंदिर बंद;’मीडियानं देखील निघून जावं’

शबरीमाला मंदिर वाद; सामाजिक कार्यकर्त्या फातिमा यांच्या घराची तोडफोड

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; नव्या वादाला सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -