घरताज्या घडामोडीMPSC Exam : न्यायालयीन कारणांमुळे एमपीएससीच्या गट ब मुख्य परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांचं...

MPSC Exam : न्यायालयीन कारणांमुळे एमपीएससीच्या गट ब मुख्य परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. २९ जानेवारी, २०२२, दिनांक ३० जानेवारी, २०२२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.

न्यायालयीन कारणांमुळे एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. MPSCची परीक्षा ५ आणि १२ फेब्रुवारीला होणार होती परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढाई सुरु केली असून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत दिली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर या परीक्षांची पुन्हा घोषणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्विट करत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत माहिती दिली आहे. कोरोना काळात उमेदवारांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. आता विद्यार्थ्यांनी आयोगाविरोधात थेट न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी उत्तरतालिकेसंदर्भात उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २ फेब्रुवारी २०२२ ला सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तर तालिकेसंदर्भातील दाखल रिट याचिकेवर न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर विषयांकित परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. अंतिम न्यायनिर्णय येईपय॑त परीक्षेच्या आयोजनासंदभांतील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. २९ जानेवारी, २०२२, दिनांक ३० जानेवारी, २०२२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. परीक्षा हुकल्यामुळे मुख्य परीक्षेला बसू देण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना न्यायालय दिलासा देणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एमपीएससीने यापूर्वी अनेक वेळा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.


हेही वाचा : Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -