घरताज्या घडामोडीMumbai bank: मुंबई बँक संचालक प्रवीण दरेकर 'कोट्याधीश' मजूर म्हणून अपात्र, सहकार...

Mumbai bank: मुंबई बँक संचालक प्रवीण दरेकर ‘कोट्याधीश’ मजूर म्हणून अपात्र, सहकार विभागाची कारवाई

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार म्हणून निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये दरेकरांनी कोट्यावधीची मालमत्ता आणि व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे. परंतु दरेकरांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मजूर म्हणून अर्ज केला होता. या अर्जावर विरोधी पॅनलने आक्षेप घेतला होता. सहकार विभागाकडून आता दरेकरांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. मुंबै बँकेवर प्रवीण दरेकर १९९७ पासून मजूर म्हणूनच निवडणूक लढवत असल्यामुळे शासनाची त्यांनी फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. देरकारांना हा मोठा धक्काच आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार म्हणून निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये दरेकरांनी कोट्यावधीची मालमत्ता आणि व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दरेकरांना आमदार म्हणूनही अडीच लाख रुपयांचे मानधन मिळते त्यामुळे दरेकर मजूर नाहीत हे स्पष्ट होत आहे. परंतु मुंबै बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचे २१ उमेदवार निवडून आले आहेत. दरेकरांनी मुंबई बँकवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. सहकार विभागाने दरेकरांना मजूर म्हणून अपात्र का घोषित करु नये यासाठी नोटीसही पाठवली होती.

- Advertisement -

मुंबई बँक निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर म्हणून अर्ज केल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दरेकरांना नोटीस पाठवली होती. मजूर म्हणून आपल्याला का घोषित करु नये असे नोटीसमध्ये सहकार विभागाकडून म्हटले होते. यासाठी दरेकरांना ३१ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. या नोटीसवर दरेकरांकडून कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही यामुळे त्यांना मजूर म्हणून अपात्र घोषित करण्यात आले आहे.

दरेकरांकडून ठेवीदारांची फसवणूक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर म्हणून अर्ज दाखल केला होता. यावर आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आक्षेप घेतला. प्रवीण दरेकरांनी बँकेतील ठेवीदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Bank election: मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला यश दिलं, प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -