घरताज्या घडामोडीMumbai Bank election: मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला यश दिलं,...

Mumbai Bank election: मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला यश दिलं, प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला मुंबई बँक निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळाले आहे. यापूर्वी सहकार पॅनलच्या १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर आता ४ जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे मुंबई बँकवर प्रवीण दरेकरांचे वर्चस्व राहिले आहे. मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला, प्रलोभनाला आणि धमक्यांना न घाबरता सहकार पॅनलला यश दिले असल्याची प्रतिक्रियी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून जो कारभार केला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाला असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबईकरांनी मुंबईतील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पहिल्या १७ जागा बिनविरोध निवड झाल्यानंतर ज्या ४ जागांवर निवडणूक लागली होती. त्या चारही जागांवर उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आहेत. मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो कारभार करण्यात आला आहे. त्या कारभारावर शिक्कामोर्तब निवडणुकीमुळे झाला असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुंबई जिल्हा बँकेवरुन अनेक लोकांनी टीका टीप्पणी केली. मुंबई बँक आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबई बँकेतील सहकाऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाबार्ड, आरबीआय, सहकार खाते यांच्या निकषामध्ये बसत बँकेला प्रगतीकडे नेण्याचे काम केले यामुळे मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला १०० टक्के यश दिले आहे. अशा शब्दात दरेकरांनी विरोधकांना सुनावले आहे.

फडणवीसांकडून वेळोवेळी मार्गदर्शन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बँकेंच्या निवडणुकीबाबत सतत आढावा घेत होते. त्यांचे या बँकेच्या वाटचालीमध्ये फार मोठे योगदान आहे. ज्या काही योजना आणल्या त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणल्या होत्या. पालकत्वाच्या भूमिकेतून फडणवीस सातत्याने मार्गदर्शन करत असतात असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुंबई बँकेवर सहकार पॅनलचा दणदणीत विजय

मुंबई सहकारी बँक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली होती. पंरतु ४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक लागली होती. यातील चारही जागांवर सहकार पॅनलचा विजय झाला असून जास्त मतं मिळाली आहेत. यामध्ये मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलमधील विठ्ठलराव भोसले यांचा विजय झाला आहे. तर प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी, महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ आणि राखीव मतदार संघातून अनिल गजरे यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.


हेही वाचा : Corona Virus : कोरोना वाढल्यास महाराष्ट्रात पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध लागू होणार, विजय वडेट्टीवारांचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -