घरदेश-विदेशLAC वाद: चीनकडून लडाखच्या सीमेवर 60,000 सैनिक तैनात, भारत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

LAC वाद: चीनकडून लडाखच्या सीमेवर 60,000 सैनिक तैनात, भारत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

Subscribe

सूत्रांनी सांगितले की, भारतीय बाजू चिनी सैन्यासह फक्त एक किंवा दोन ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या स्थितीत आहे, कारण बहुतेक ठिकाणी दोन्ही सैन्ये बफर झोनद्वारे विभक्त आहेत. दोन्ही बाजू एकमेकांच्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणात पाळत ठेवणारे ड्रोनदेखील तैनात करत आहेत.

नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं लडाखमध्ये भारतीय सीमेच्या समोर 60,000 सैनिक तैनात केलेत. वास्तविक नियंत्रण रेषा (LAC)वर सेनेच्या वेगानं तैनातीमुळे चीननं मनसुबे ठीक नसल्याचं समोर येतंय. गरमीच्या मोसमात सीमेवर चीनच्या सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, कारण त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सीमेवर आणले जात होते. ते आता परतले आहे, पण आता लडाखच्या सीमेवर 60 हजार सैनिकांना तैनात करण्यात आलंय.

भारताकडून ठोस पावलं उचलण्यास सुरुवात

चीनकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे, कारण चीनने वास्तविक नियंत्रण रेषे (LAC)च्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे सुरू ठेवले. चीननं आता दौलत बेग ओल्डी क्षेत्राच्या समोर आणि पँगाँग लेक क्षेत्रात नव्या रस्ते निर्माणाला सुरुवात केलीय. तसेच चीनच्या धाडसी कृत्याविरोधात भारतानंही जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू ठेवलीय.

- Advertisement -

भारतही पायाभूत सुविधा निर्माण करणार

चीनच्या कोणत्याही चिथावणीखोर कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व आघाडीच्या लडाखमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे दहशतवाद विरोधी पथक तैनात केलेय. यासोबतच भारताकडून पायाभूत सुविधांची उभारणीही सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्कर कोणत्याही तणावाच्या स्थितीत सैन्य जमा करण्यासाठी सर्व पर्वतीय मार्ग खुले ठेवत आहेत.

‘हिवाळी तैनातीमुळे चिनी सैनिक त्रस्त’

सूत्रांनी सांगितले की, भारतीय बाजू चिनी सैन्यासह फक्त एक किंवा दोन ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या स्थितीत आहे, कारण बहुतेक ठिकाणी दोन्ही सैन्ये बफर झोनद्वारे विभक्त आहेत. दोन्ही बाजू एकमेकांच्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणात पाळत ठेवणारे ड्रोनदेखील तैनात करत आहेत. हिवाळ्यातील तैनातीमुळे चिनी लोकांना त्रास होत आहे, कारण त्यांच्या सैन्यात सातत्यानं बदल होत आहे. त्यामुळे त्यांना वातावरणाशी जुळवून घेणे अवघड जात आहे.

- Advertisement -

चीनच्या एकतर्फी आणि चिथावणीखोर कारवाईला तोंड देण्यासाठी तयारी

उंच ठिकाणी हिवाळ्यात चिनी सैन्याच्या पहिल्या तैनातीदरम्यान त्यांनी जवळजवळ दररोज त्यांच्या सैन्याची ठिकाणं बदलली.कारण गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये सुरू झालेल्या चिनी आक्रमणानंतर त्यांना थंडीमुळे त्रास सहन करावा लागला. संरक्षण मंत्रालयाने आपल्या वर्षाच्या शेवटच्या आढाव्यात म्हटले आहे की, LAC च्या बाजूने एकापेक्षा जास्त भागात त्यांच्या सैन्याद्वारे यथास्थिती बदल केला आहे.

पूर्व लडाखमध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक अनेक ठिकाणी तैनात

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांचे सैन्य विविध स्तरांवर बोलणी करत आहेत. सातत्यपूर्ण संयुक्त प्रयत्नांनंतर अनेक ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यात आले, परंतु दोन्ही बाजूंच्या सैन्याची संख्या सारखीच राहिलीय किंवा ज्या भागात वाद सुरू आहे, तेथे मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रादेशिक अखंडतेची खात्री करण्यासाठी आणि सैन्याचा विस्तार लक्षात घेऊन पीएलए दल आणि लष्करी पायाभूत सुविधांना पूरक करण्यासाठी धोक्याचे मूल्यांकन आणि अंतर्गत सल्लामसलत यांच्या परिणामी सैन्यांची सतत जमवाजमवकेली जात आहे.

भारताने पूल, रस्ते, रेल्वे मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विणले

भारताच्या दाव्यांच्या अखंडतेची खात्री करून सैन्याने चिनी सैन्यांशी खंबीरपणे आणि शांततेने व्यवहार करणे सुरू ठेवलेय. रस्ते, सर्व हवामान बोगदे, चार मोक्याच्या रेल्वे मार्ग, ब्रह्मपुत्रेवरील अतिरिक्त पूल, भारत-चीन सीमारेषेवरील रस्ते यासह सर्वसमावेशक उत्तर सीमेवर पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशन आणि विकास केला जात आहे. इंधन आणि दारूगोळा साठवणे. दुहेरी वापराच्या पायाभूत सुविधा ओळखण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले आहेत.


हेही वाचा- जेव्हा हरिण वाघाला लपून लपून बघते; नंतर झालं असं काही

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -