घरमहाराष्ट्रMumbai : 'वंदे भारत'चे जनक सुधांशू मणींच्या उपस्थितीत साजरा होणार 'अभियंता दिन'

Mumbai : ‘वंदे भारत’चे जनक सुधांशू मणींच्या उपस्थितीत साजरा होणार ‘अभियंता दिन’

Subscribe

मुंबई : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त मुंबई महापालिकेतर्फे १५ सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, ‘वंदे भारत ट्रेन’ चे जनक सुधांशू मणी या सोहळ्यात महापालिकेच्या अभियंत्‍यांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

आज मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी ‘ वंदे भारत’ ट्रेन सुरू झाल्या आहेत. त्यास खूप चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. तसेच, महाराष्ट्रात व अन्य काही राज्यांतही या ‘वंदे भारत’ ट्रेन सुरु करण्याबाबत मागण्या करण्यात येत आहेत. त्यास केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती राष्‍ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबई महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात १५ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते रात्री दहा या वेळेत होत असलेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्‍हणून ‘वंदे भारत ट्रेन’ चे जनक सुधांशू मणी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – PM Crop Insurance Scheme : कृषी खात्याच्या छाननीत अपात्र अर्ज बाद; कृषीमंत्र्यांची समयसूचकता

- Advertisement -

तसेच, मुंबई महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल चहल हे विशेष अतिथी असतील. त्याचप्रमाणे, अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे हे सन्माननीय अतिथी म्‍हणून उपस्थित रहाणार आहेत. उपआयुक्‍त (पायाभूत सुविधा) उल्‍हास महाले व सहकारी अधिकारी वर्ग, अभियंता वर्ग आदींनी या सोहळ्याचे नियोजन व आयोजन केले आहे.

हेही वाचा – Breaking : मनोज जरांगेंचे उपोषण सुटणार कधी? जालन्याला जाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंची अनिश्चितता

सदर, कार्यक्रमाच्‍या प्रारंभी महापालिका अभियंते कलाविष्‍कार सादर करणार आहेत. त्‍यानंतर महापालिकेतील अभियांत्रिकीशी संबंधित प्रत्येक विभागाची माहिती, कामगिरी ही चित्रफितीद्वारे सादर करण्यात येईल. त्यानंतर सहआयुक्‍त (महापालिका आयुक्‍त कार्यालय) चंद्रशेखर चोरे हे प्रशासकीय अभियांत्रिकी या विषयावर संबोधित करणार आहेत.
महापालिकेतील अभियंत्यांनी लिहिलेले लेख, काव्य, प्रवासवर्णन आदी साहित्याचे संकलित रुप असलेल्या ‘मी अभियंता’ या पुस्‍तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्‍या अखेरीस प्रख्यात गायक शान, वैशाली सामंत, समीर दाते, पी. गणेश हे सांगितिक सादरीकरण करतील, अशी माहिती उपआयुक्त उल्हास महाले यांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -