घरमहाराष्ट्रपुणेMumbai-Goa Highway : निवळी घाटात टॅंकर उलटल्याने वाहतूक ठप्प; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचेही तेच...

Mumbai-Goa Highway : निवळी घाटात टॅंकर उलटल्याने वाहतूक ठप्प; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचेही तेच हाल

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात गॅस टँकर उलटल्याने वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली आहे.

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) निवळी (Niwali) घाटात एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टॅंकर उलटल्यामुळे अपघात झाला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ही घटना आज दुपारी अडीच वाजता घडली. दरम्यान या अपघातामुळे मुंबई गोवा या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात गॅस टँकर उलटल्याने वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली आहे. एलपीजी टँकर उलटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही ही वाहतूक सुरळीत झाली नसल्याची माहिती आहे. या महामार्गावरील निवळी घाट हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत असल्याचे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अपघातामुळे अधोरेखीत होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा; ठाकरे गट-शिंदे गट आमने सामने

टॅंकर रस्त्याच्या मधोमध

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाट उतरत असलेला गॅस वाहू टँकर महामार्गावर मधोमध आडवा झाल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगाच्या वाटेवर; शिंदे गटातील आमदाराचा दावा

पुन्हा वाहतूक थांबवली जाणार

रत्नागिरीच्या निवळी घाटात उलटलेल्या टॅंकरला बाजुला करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठई वाहतूक पोलिसांसह, एमआरडीसीचे अधिकारी, अग्नीशमन दलाचे पथके दाखल झाले आहेत. असे जरी असले तरी पोलिसांकडून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पण, टँकर हटवताना पुन्हा वाहतूक थांबवली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

लागोपाठ सुट्ट्या आल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर चारचाकी वाहनांनी वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. नवी मुंबईमधील वाशी टोलनाक्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची दृष्य समोर येत आहेत. बोरघाटामध्ये संथ गतीने वाहतूक सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -