Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पवारांनीच भुजबळांना तेलगी प्रकरणातून वाचवले! जितेंद्र आव्हाड यांचे संकेत

पवारांनीच भुजबळांना तेलगी प्रकरणातून वाचवले! जितेंद्र आव्हाड यांचे संकेत

Subscribe

तेलगी प्रकरणात ओरिजिनल चार्जशीटमधील काही नावे वगळण्यात आली होती. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केले. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये  कोणाचे नाव घेतले नसले तरी  शरद पवार यांनीच तेलगी प्रकरणातून  भुजबळ यांना  वाचवले होते, असे स्प्ष्ट संकेत आव्हाडांनी दिले आहेत

मुंबई : तेलगी प्रकरणात ओरिजिनल चार्जशीटमधील काही नावे वगळण्यात आली होती. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केले. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये  कोणाचे नाव घेतले नसले तरी  शरद पवार यांनीच तेलगी प्रकरणातून  भुजबळ यांना  वाचवले होते, असे स्प्ष्ट संकेत आव्हाडांनी दिले आहेत. (Mumbai It was Sharad Pawar who saved Chhagan Bhujbal from the Telgi case Hints by Jitendra Awhad)

रविवारी, बीडमधील जाहीर सभेत बोलताना, अन्न आणि  नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शरद पवार यांच्यावर १९९१, १९९२ आणि १९९३ मध्ये आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही मात्र गृहमंत्री असताना आपला राजीनामा घेण्यात आला. अशी टीका भुजबळ यांनी केली होती. या टीकेला पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.  ठाण्यात भुजबळ यांचा पुतळा जाळण्यात आला. तसेच पुण्यात भुजबळ यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करून उत्तर दिले. पवारांबद्दल भुजबळ एवढे बोलू शकतात हे ऐकून दुःख होते. पवारांनी काय दिले असा प्रश्न विचारला जातो, यांना पवाारांनी काय दिले नाही, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी अतिरिक्त महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतले. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले की याबाबत तुम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करा. त्याप्रमाणे  दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली.  त्यानंतर जी ओरिजनल चार्जशीट होती ज्यामध्ये जी नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला. तो अदृश्य हात कुणाचा, समझने वाले को इशारा काफी होता है” असे आव्हाड यांनी आपल्या  ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भावना गवळी म्हणाल्या; “ठाकरेंनी फडणवीसांबरोबर…” )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -