घरदेश-विदेशLive Update : तुम्ही बापाचे विचार विकले, तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला-...

Live Update : तुम्ही बापाचे विचार विकले, तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला- एकनाथ शिंदे

Subscribe

तुम्ही बापाचे विचार विकले, तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला- एकनाथ शिंदे

शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची- एकनाथ शिंदे

- Advertisement -

आजचा दसरा मेळावा अभूतपूर्व, मी भारावून गेलोय; उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

अनेक वर्षांचा दसरा मेळावा लक्षात आहे, पण हा दसरा मेळावा पहिल्यांदाच. अभूतपूर्व. मी भारावून गेलोय.
भाषणासाठी अनेक मुद्दे. पण किती बोलू शकेन माहित नाही. तुमचं हे प्रेम पाहून शब्द सुचत नाहीय. हे विकत नाही. मिळत. हे ओरबाडून नाही घेता येत. ही कोरडी गर्दी नाही. ही अंतकरण असलेल्या माझ्या शिवसैनिकांची गर्दी आहे.

- Advertisement -

तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. प्रत्येक वेळेला संकटावेळी संरक्षक कवच करून मी अनुभवतोय. आई भवानीच्या आशीर्वादाचं जीवंत संरक्षक कवच आहे. शिवसेनेमध्ये गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुजडाला चिकटलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. शिवतीर्थ बघितल्यावर गद्दारांना कळेला. येथे एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. माता भगिनींना विचारा गावारून पायी चालत आले आहेत. तिकडे एक एकटाचा आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे.

दरवर्षी प्रमाणे मेळाव्यानंतर रावणदहन होणार आहे. यावेळी रावण वेगळा आहे. आतापर्यंत रावण दहा तोंडाचा होता. आता किती झाला? ५० खोक्यांचा खोकासूर आहे, धोकासूर आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापसुद्धा होतो. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो तेव्हा बोटंसुद्धा हालत नव्हती, तेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा हो जे कट करणारे आप्पा ते कटाप्पा. पण त्यांना कोणाला कल्पना नाही. हा फक्त उद्धव ठाकरे नाही, हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतलेला आहे, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. हा तेजाचा शाप आहे. ज्यांना आपण सगळ्यांनी सगळं काही दिलं. मंत्रिपदं दिली. आमदारकी, खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना काहीच दिलं नाही  ते निष्ठेने माझ्यासोबत आहेत. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत शिवसेना आहे. जोपर्यंत तुम्ही सांगाल तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे तुमच्यापैकी कोणीतरी सांगितलं पाहिजे. गद्दारांनी नाही.

बाप मंत्री, कारटं खासदार. नातू नगरसेवक. कोणाचा आमदार. सगळं काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. का मी झालो मुख्यमंत्री? का केली आघाडी. ही काही लपवण्याची गोष्ट नाही. भाजपाने पाठीत वार केला म्हणून महाविकास आघाडी केली. तुम्ही साक्ष आहात. जर मी हिंदुत्त्व सोडलं असेल तर तुम्ही मला सांगा खरंच मी हिंदुत्त्व सोडलं.

तेव्हा बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती. तेव्हा माहित नव्हतं का राष्ट्रवादी काँग्रेसवाले मांडीला मांडी लावून बसले आहेत. भाजपाने अडीच-अडीच वर्षांची ठरलं होतं, हे मी आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायांची शपथ घेऊन सांगतोय., अडीच वर्ष तुमची, अडीच वर्ष शिवसेनेची. संभवही नही. आता जे केलंत ते तुम्ही तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं. आता जे केलं ते तेव्हा का नाही. पण शिवसेना संपवायची. तेवढ्यावरच नाही थांबले. इतरांना बाजूला सारून मंत्रिपदं दिली. आता मुख्यमंत्री झाला. आता याला शिवसेना प्रमुख व्हायचं.
बाप चोरणारी औलाद. बापाचा कतरी विचार करायचा. त्यांना काय वाटलं असेल. आनंद दिघे २० वर्षे होऊन गेली एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन. पण आज त्यांना आठवण येतेय. आनंद दिघे एकनिष्ठ होते. ते जातानासुद्धा भगव्यातून गेले. भगवा नाही सोडला नाही.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले. पण दीड दिवसांच्या गणपीतंच विसर्जन झालं. पण पुन्हा उपमुख्यमंत्री पदी आले. मी टोमणा मारला? कायदा पाळायचा तर तो सर्वांनी पाळायचा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाडायची. कोणी गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार करतोय, कोणी हातपाय तोडायची भाषा करतोय. हाच कायदा पाळायचता असेल तर आम्ही नाही कायदा पाळणार.

नवी मुंबईचे मढवी, प्रेस कॉन्स्फरस घेतली. त्यांना पोलिसांच्या धमक्या येत आहेत, की या गटात ये नाहीतर जीव घेऊन. रायगडच्या नेत्यांना धमक्या आल्या. हॉटेल फोडण्याच्या धमक्या. हा तुमचा कायदा. तडीपार काढत आहेत. ग्राम पंचायतीच्या निवडणुकतही धमक्या. त्या गटात जा नाहीतर केसेस बाहेर काढू. सलून काढलंय का तुम्ही. मी शांत राहा सांगतोय म्हणून हे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहुद्या. त्यांना पिसाळायला लावू नका. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवळायला बसा. आज तिकडे जे काही चाललंय, इकडे जिवंत मेळावा आहे. ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्यात तिकडे. शिवसेना कशी चालवायची. हिंदुत्त्व कसं पुढे न्यायचे हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. भाजपाकडून हिंदुत्त्वकाडून सिकायची गरडच नाही. भाजपाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही. आजसुद्धा हिंदू आणि उद्यासुद्धा राहू. भाजपाने आमच्यावर शिंतोडे उडवायते. पाकिस्तानच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवाता केक खाणारा तुमचा नेता ुतम्ही आम्हाला हिंदुत्त्व शिकवतं. मुफ्तीसोबत साटंलोटं करणार आणि आम्हाला हिंदुत्त्व शिकवणार. हिंदुत्त्व खणखणीत असलं पाहिजे. हिंदुत्त्वावर मी बोलणारच आहे. हिंदुत्त्वावर बोलत गाईवरच का बोलताय, महागाईवरही बोला. अमुक महागलं, तमुक महागालं. जय श्रीराम. हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे.

रुपया घसरत चालला आहे. कोंबडी चोरांवर येते नाही बोलायचं. प्रेमाने आले. माझ्यासाठी आले. उद्धव ठाकरे विचार काय देणार. शिव्या देणं खूप सोपं असतं. विचार देणं फार कठीण असतं. विचारांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. २०१४ ला मोदींचं सरकार आलं तेव्हा रुपयांच्या तुलनेत डॉलरचा भाव काय होता. आज काय आहे. सुषमा स्वराज तेव्हा बोलल्या होत्या की टीव्ही लावाला भिती वाटते. आता रुपयाची किंमत ८० च्या वर गेला आहे. ज्या देशाचं चलन घसरतं, रुपया घसरतं तेव्हा त्या देशाची पतही घसरत असते. माझ्या देशाची पत घसरत आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा हे देशाचं गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरमंत्री आहे हे कळत नाही. मध्येच मुंबईत येणार. शिवसेनेला जमीन दाखवा म्हणतात. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. अमित शहा आम्हाला जमीन दाखवाच. ही जमीन आमचीच आहे. आमची मातृभूमी आहे. सात-आठ वर्ष आली, मोदींच्या मुलाखती आम्ही ऐकतो की पाकिस्तान को उनकी भाषामें उत्तर देना चाहीये. कोणती भाषा. चीन घुसलेला आहे. लडाखमध्ये घुसला. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही घेऊन नाचू. गद्दारांच्या पालखीत बसून का मिरवताय निवडणुका. पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवा. तिकडे शेपट्या घालायच्या इथे पंजे लढवायचे. ही काय मर्दुमगी?

हे सरकार बदलल्यानंतर गुजरातमध्ये जात आहे. मुंबईमध्येही अनेकजण गुजराती आहेत. ते सगळे काय गुजरातमध्ये जाणार नाहीत. नोकरीसाठी जे मुंबईत आलेत ते कुठे जाणार. मिंधे सरकार माना घालून बसले आहेत. पुष्पा म्हणतो झुकेगा नहीं साला, हे म्हणतात उठेगा नहीं साला. शंभर दिवसांपैकी नव्वद दिवस दिल्लीत गेले असतील. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. महत्त्वाच्या विषयांवर बोलायला तयार नाही. हिंदुत्त्वावर बोलतानाही माझं मत स्पष्ट आहे, माझी तयारी आहे. चला सगळे एकदा तथाकथित हिंदु आहेत त्यांनी एका व्यासपीठावर यावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्त्व सांगतो. असं जर असेल तर व्याख्या स्पष्ट आहे. विचार सोडले असं म्हणणाऱ्यांनो ऐका, तुम्ही साक्ष आहात. बाळासाहेब म्हणाले होते जो माझ्या या देशावर प्रेम करतो तो माझा आहे. तो मुसलमान असला तरी तो आमचा आहे.

तुमच्या धर्माची मस्ती आमच्याशी रस्त्यावर करू लागला तर कडवट देशाभिमानी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. हातात जपमाळ असताना समोर अतिरेकी आला तर रामराम करून पळण्यापेक्षा हातात स्टेनगन असली पाहिजे. तुमचं हिंदुत्त्व नक्की आहे तरी काय? इतर सर्वधर्मिय असं तुमचं हिंदुत्त्व आहे.


शिंदे गटाचा दसरा मेळावा नाही, त्यांचा कचरा मेळावा; भास्कर जाधवांचा टोला

खरंतर कोंबडी वाल्याचा आज समाचार घ्यायचा, शिवसेना सोडल्यानंतर त्याची पु़ढचं टोक तुटलं आहे. याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. हा अक्कलेचा कांदा, कोंबडीवाला. शिवसेनाप्रमुखांनी त्याला मोठा केला, पण शेवटी ते शिपाई तो शिपाईच. भाजपाचे लोक त्यांना खांद्यावर घेऊन नाचत आहेत. १८ वर्षे शिवसेना सोडून झाली. मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपली, अशी टीका केली.


उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल


दहा वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्त्व कोणत्या कुंठीवर टांगून ठेवलं होतं- सुषमा अंधारे

नारायण तुमच्या व्हायात बाजारबुणग्यांवर मला बोलायचंच नाही, तुम्ही शहाणे सुरते आहात.

सोनियांजींच्या पायावर लोटांगण घालत नारायण राणेंनी दहा वर्ष आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्री पदं भोगली

राष्ट्रवादीकडे जात होतात रामदास कदमांनी तुमचं हिंदुत्त्व कुठं गहाण ठेवलं होतं,

हिंदू धर्मातील असा कोणता ग्रंथ आहे, वेद आहे ज्या ग्रंथात हिंदू धर्माचा होण्यासाठी इतर धर्मांचा द्वेष करण्यास सांगितलं आहे? तुम्हाला हिंदुत्त्व कळलं असतं तर पसायदान ही संकल्पना सर्वांना कळली असती. हीच संकल्पना घेऊन उद्धव ठाकरे घेऊन निघाले आहेत. हिंदुत्त्वाला तुम्ही कलंक लावला, हिंदु माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही.

छातीठोकपणे टीका केली, तुमच्यासारखे बिळात जाऊन नाही बसलो. आधी गळे काढून रडायचं आणि मग मिंधे गटात सामील व्हायचं.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भटके, आदिवासी, अठरा पगड जातीचे लोक उद्धव ठाकरेंसोबत येत आहेत तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन सरकरत आहे.

श्रीकांत शिंदेची कल्याणची जागा भाजपाचा देऊन जागा, प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील जागा भाजपाला देऊन टाका मग कळेल भाजपा हिंदू आहे की नाही.

जे.पी. नड्डा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते, तेव्हा तुम्ही दातखिळी बसवून का बसला होता?


जमलेलेल ते मावळे, उडाले ते कावळे- सुभाष देसाई

भाजपाने काकवळ ठेवले आहेत, काकवळ ठेवले आहे तोवर कावळे शितं टीपत आहेत, भाजपाने शीतं टाकायचं थांबवलं की कावळे काव काव करतील

मावळे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहतील

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आम्हा सर्व परदेशातील हिंदुस्थानी मराठी माणसांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने सांभाळलं, त्यांना दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडी

शिवाजी पार्कवरील अस्सल दसरा मेळावा डोळे बघून पाहावा, अनेकजण कुठून कुठून आलेत.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली सरकार, त्यामध्ये काम करणारे आम्ही, शिवसेनेचे मंत्री मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने काम करत आहेत

मराठी भाषेचं सेवा करण्याचं काम दिलं मला, मराठी भाषा प्रेमी, त्यातील तज्ज्ञ, त्या संस्था यांच्या सर्व मंडळी चिंतेत आहेत. दोन अडीच वर्षांत मराठी भाषेला पुढे आणण्यासाठी,न्याय देण्यासाठी मराठी भाषा विभागाने ठोस निर्णय घेतले. मराठी सक्तीने शिकवण्याचा कायदा केला. मराठी भाषा भवनचं काम प्रत्यक्ष सुरू केलं.

मरिन ड्राइव्हसारख्या प्रतिष्ठित भागात मराठी भाषेतच दुकानांच्या पाट्या लागल्या पाहिजे, आरोळ्या मारल्या जात होतं. काम होत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या कायद्याने पाट्या मराठी झाल्या. पण काही मुठभर लोक अपशकून करायचा प्रयत्न करत आहेत.

सरकारच्या लोकांना मराठी भाषेबद्दल उदासीन असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सरकारी शाळातील परीक्षा त्यातील पेपर हिंदी आणि इंग्रजीत केले जातायत. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवलं. एवढी अवहेलना आमच्या काळात झाली नसती. यासाठीच आपल्याला कडमुडं सरकार गाडून टाकून, भगव्याचं सरकार आणावं लागेल.

भाजपाचं लोक, खासकरून देवेंद्र फडणवीस आले नागपूरहून आणि इथे धमकी देताहेत की मुंबई पालिकेच्या शिवसेनेच्या कारभारीच चौकशी करू. शंभर चौकशी करा, काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी इथल्या कोपऱ्याकोपऱ्यात फिरून मुंबई सुंदर बनवली आहे. फडणवीसांनी आधी नागपूरमध्ये चौकशी करावी. नागपूरमध्ये आपली बस योजना सुरू केली. या योजनेत खासगी ठेकेदाराला बस चालवायला दिल्या. सुरुवातीला तिकिटाच्या उत्पन्नात काम करण्याची सुविधा होती. आता त्यासाठी १०० कोटी देण्याचा घाट घातला जात आहे. याची चौकशी करणार का फडणवीस.

नागपूरकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणून ओसीडब्ल्यू भाजपाशी संबंधित कंपनीला ठेका दिला. चोवीस तास पाणी नागपूरकरांना मिळालंच नाही. नागपूर तरीही तहानलेलं आहे. ओसीडब्ल्यू कंपनी ८० कोटी रुपये पालिकेकडे मागतेय. त्यामुळे भाजपाचे नेते दबाव आणत आहेत. ७० कोटी तरी कंपनीला द्या असा दबाव आणत आहेत. नगरविकास विभाग मेहेरबान का होत आहे, याची चौकशी करा.

पुन्हा एकदा शिवसेनेच्याच हातात मुंबई येणार.


माझ्याकडे उद्धव ठाकरेसाहेब आहेत, त्यांच्या बळावर सर्वांना नेस्तनाबूत करणार- अंबादास दानवे


शिंदे गटाकडून गाणं प्रदर्शित, महाविकास आघाडीवर खरपूस टीका


उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट


ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल


हृदयविकाराच्या धक्क्याने शिंदे गटातील कार्यकर्त्याचा प्रवासादरम्यान मृत्यू


रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची धमकी, अनोळखी नंबरवरून रुग्णालयात फोन


पंकजा मुंडेंच्या सभेनंतर भगवान गडावर कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज


तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगण राष्ट्र समितीचे नाव बदलले. भारत राष्ट्र समिती नामकरण करून राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची केसीआर यांची तयारी.


अरुणाचल प्रदेशात आर्मीचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट ठार

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचवेळी बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचा नवा टिझर जारी


अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा


ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिक जमण्यास सुरुवात


शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार


वांद्रे येथे ठाकरे गट आणि शिंदे गटाची पोस्टरबाजी


शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची सदस्य नोंदणी होणार


मध्य रेल्वे आजही पूर्ण क्षमतेने धावणार; दसरा मेळाव्यानिमित्त महत्वाच निर्णय

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेच्या कमी फेऱ्या होतात (1460) पण आज मध्य रेल्वेच्या संपूरन फेऱ्या होणार आहेत. (1810) आजच्या दसऱ्या मेळाव्यासाठी लाखो शिवसैनिक मुंबईला येत असतात. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील सी – लिंकवर भीषण अपघात, 12 जण जखमी


ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रंगणार सामना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -