घरमहाराष्ट्र...तर मुंबईची दूध कोंडी निश्चित

…तर मुंबईची दूध कोंडी निश्चित

Subscribe

दूध आंदोलन चिघळ्याची शक्यता लक्षात घेता गुरूवारी मुंबईची दूध कोंडी निश्चित मानली जात आहे. राज्यासह गुजरातमधून येणारे दूध टँकर रोखल्याने त्याचा परिणाम हा मुंबईच्या दूध पुरवठ्यावर होणार आहे. शिवाय, रेल्वेने केवळ ८८ हजार लिटर दूध मुंबईमध्ये येणार असल्याने ३० ते ३५ लाख लिटर दूधाची गरज असलेल्या मुंबईची दूध कोंडी निश्चित मानली जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले. मुंबईची दूध कोंडी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक ठिकाणी दूध टँकर अडवले. पण, अद्याप तरी मुंबईची दूध कोंडी झालेली नाही. मुंबईला असणारी दुधाची गरज किमान तिसऱ्या दिवशी तरी व्यवस्थितपणे पुरवली जात आहे. मुंबईच्या दिशेने येणारे दूध अडवल्यानंतर देखील मुंबईच्या दूध पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण, मुंबईला आवश्यक असलेल्या दूधाचा साठा करून ठेवण्यात आला होता. पण तीन दिवसानंतर मात्र मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. संकलित करून ठेवलेले दूध संपत आल्याने गुरूवारपासून मुंबईच्या दूध पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. गुजरातवरून येणारे दूधाचे टँकर देखील आता जागोजागी अडवले जात आहेत. त्यामुळे रेल्वेने दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला. मुंबईला रोज किमान ३५ ते ४० लाख लिटर दुधाची गरज आहे. पण, रेल्वेने केवळ ८८ हजार लिटर दूध आणण्याची योजना आहे. त्यामुळे दूध आंदोलन चिघळत असताना रेल्वेने दूध आणून देखील मुंबईची दूधाची गरज भागवणे कठीण आहे. शिवाय राज्यभरात देखील मुंबईला दूध पुरवणारे टँकर अडवले जात आहे. त्यामुळे गुरूवारपासून मुंबईच्या दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईची दूध कोंडी निश्चित

दुधाला प्रति लिटर ५ रूपये दरवाढ देण्याच्या मुद्यावरून खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघनेने आंदोलनाची हाक दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची दूध कोंडी केल्यास सरकार जागे होईल याच प्रयत्नाने मुंबईची दूध कोंडी करण्यात येत आहे. दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेने येणारे दूधाचे टँकर जागोजागी रोखण्याच येत आहेत. दूध टँकरना पोलीस संरक्षण देण्यात आले. मात्र, त्यानंतर देखील दूध टँकर फोडण्याच्या घटना घडल्या. राजू शेट्टी स्वत: रस्त्यावर उतरले असून त्यांनी पालघर येथे ठिय्या मांडला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे दूध टँकर रोखल्यानंतर गुजरातचे दूध मुंबईत येणार हे नक्की! त्यामुळे पालघर येथे कार्यकर्त्यांसोबत दूध टँकर अडवण्याची रणनिती शेट्टी यांनी आखली आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेलने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुंबईच्या दूध पुरवठ्यापैकी जवळपास ३० टक्के पुरवठा हा गुजरातमधून होतो. पण या दूध पुरवठ्याला देखील आता आंदोलनाचा फटका बसला असून मुंबईची दूध कोंडी निश्चित मानली जात आहे. आंदोलनामुळे दूध संघांनी देखील दूध संकलन काही प्रमाणात बंद केले आहे.

- Advertisement -

५ रूपये दरवाढ देण्याची तयारी

दरम्यान, आंदोलनानंतर राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रति लिटर ५ रूपये दरवाढ देण्याची तयारी दर्शवली. मात्र राजू शेट्टी यांनी याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे नाही अशी भूमिका घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -