घरमहाराष्ट्रपाच वर्षात ७४३ मुंबई पोलिसांचा मृत्यू; ही आहेत मृत्यूची कारणे

पाच वर्षात ७४३ मुंबई पोलिसांचा मृत्यू; ही आहेत मृत्यूची कारणे

Subscribe

मागच्या पाच वर्षात मुंबई पोलिसांमध्ये विविध आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अतिरिक्त कामामुळे येणारा ताण अजूनही विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.

मुंबई पोलीस दलातील पोलिसांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून मागील पाच वर्षाच्या आकडेवारीत पोलिसांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस दलात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मागील पाच वर्षात अधिकतर पोलीसांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला असून त्यापाठोपाठ पोलिसांचा मृत्यू कर्करोग या आजाराने झाल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षात ७४२ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १५७ जणांचा मृत्यू हा हृदय विकाराने झाल्याचे पुढे आले आहे. २०१७ पेक्षा २०१८ मध्ये पोलिसांच्या मृत्यूत ३१ ने घट झाली आहे. मुंबई पोलीस दलात पोलीस अंमलदाराची कामाची वेळ १२ तासाहून ८ तासावर करण्यात आली असल्यामुळे पोलिसांच्या मृत्यूत घट झाली असल्याचे एक कारण समोर येत आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या असून पोलीस अधिकाऱ्या पासून शिपायापर्यंतच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या असून याचा थेट परिणाम पोलिसांच्या प्रकृतीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. वर्षभर उत्सव बंदोबस्त, नाकाबंदी व्हीआयपी बंदोबस्त तसेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांवर निवडणूकाचा ताण पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी या वर्षी मात्र यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात सर्वाधिक ताण पोलीस दलावर येतो. बंदोबस्त, नाकाबंदी, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यांच्यावर पोलिसांना बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कामाची वेळ, अवेळी खाणे, अर्धवट झोप याचा परिणाम पोलिसांच्या प्रकृतीवर होणार आहे.

- Advertisement -

हे वाचा – मित्रांसमोर काढले पत्नीचे कपडे आणि केली अमानुष मारहाण

मधुमेह, ह्रदय विकार, कर्करोग, क्षयरोग, कावीळ, श्वसनाचा त्रास, उच्चरक्तदाब हे आजार तर मुंबई पोलिसांच्या पाचवीला पुजले आहे. या सर्वांचा परिणाम पोलिसांच्या शरीरावर होत असून त्यात पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मात्र मागील दोन वर्षात पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार यांच्या कामाची वेळ १२ तासापैकी ८ तास केल्यामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबाला तसेच स्वतःच्या स्वास्थाकडे लक्ष देता येत असल्यामुळे त्याच्यांवरील बराच ताण कमी झाल्यामुळे पोलिसांना होणारे आजार देखील कमी झाले आहेत. त्याचा परिणाम पोलिस मृत्यूच्या संख्येत मागील दोन वर्षात घट झाली असल्याचे मागील पाच वर्षाच्या आकडेवारीत दिसून येत आहे.

- Advertisement -

मागील पाच वर्षात मुंबई पोलीस दलात ७४२ जणांचा विविध आजाराने मृत्यू झाला असून त्यात पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) यांचे प्रमाण ८० टक्के असून २० टक्के आकडेवारी अधिकाऱ्याची आहे. पाच वर्षात सर्वात अधिक पोलिसांचे मृत्यू हे हृदय विकाराने झाले असू त्या पाठोपाठ कर्करोगने मृत्यूचे प्रमाण आहे. मागील पाच वर्षात १५७ जणांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून कर्करोगाने मृत्यू झाल्याची संख्या ७० आहे.

२०१७च्या तुलनेत २०१८ मध्ये पोलिसांच्या मृत्यूची आकडेवारी कमी झाली असून २०१७ मध्ये १४२ जणांचा मृत्यू झाला होता तर २०१८ मध्ये हि आकडेवारी १२९ झाली आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत पोलिसांच्या मृत्यूत घट झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -