घरमहाराष्ट्रमुंबई – पुणे प्रवास सुखकर; नव्या वेळापत्रकानुसार 'इंटरसिटी एक्स्प्रेस' धावणार

मुंबई – पुणे प्रवास सुखकर; नव्या वेळापत्रकानुसार ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ धावणार

Subscribe

इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नव्या वेळापत्रकानुसार येत्या ३१ मे पासून इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे.

मुंबईपुणे मार्गावर धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळेत ३५ मिनिटांची बचत होणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नव्या वेळापत्रकानुसार येत्या ३१ मे पासून इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त २ तास ३५ मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करणार आहे. याआधी इंटरसिटीला मुंबई ते पुणे प्रवासासाठी ३ तास १७ मिनिटांचा वेळ लागत होता.

३५ मिनिटांची बचत

इंटरसिटी एक्स्प्रेस मुंबईहून सकाळी .४० वाजता सुटत असून पुण्याला सकाळी .५७ वाजता पोहोचते. तर पुण्याहून सायंकाळी .५५ सुटून मुंबईला रात्री .०५ वाजता पोहोचते. मुंबई ते पुणे १९२ किलोमीटरच्या अंतर आहेत. इंटरसिटी एक्स्प्रेसला हे अंतर कापण्यासाठी तब्बल तीन तास १५ मिनिटांचा कालावधी लागतो. कारण कर्जत येथे घाट सेक्शन असल्यामुळे बँकर जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागत होता. मात्र आता पुश-पूल इंजिनमुळे या गाडीला २ तास ३५ मिनिटे लागणार आहे. यामुळे इंटरसिटीही एक्स्प्रेसच्या वेळेत ३५ मिनिटांची बचत होणार आहे. मध्य रेल्वेने पुश-पुल पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे वेळेची बचत होणार असून पूश-पुल पद्धतीमुळे घाट मार्गावर बँकर जोडणे आणि काढणे यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ कमी होणार आहे.

- Advertisement -

इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली आहे. सात दिवसांसाठी चाचणी तत्त्वावर इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार असून ३१ मे ते ६ जून दरम्यान इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. यादरम्यान जर कोणतीही अडचण न येता इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावली आणि सर्व काही सुरळीत गेली तर हेच वेळापत्रक कायम ठेवले जाणार आहे.

- Advertisement -

वाचा – आता करा मुंबई – पुणे ‘लोकल’ प्रवास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -