घरमहाराष्ट्रMumbai Rain : आज मुंबईत ऑरेंज अलर्ट; 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : आज मुंबईत ऑरेंज अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Subscribe

Mumbai Rain : मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानंतरही मागील 2 आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनने अखेर शनिवारी राज्यात दणक्यात आगमन केले. मुंबई, ठाणे, रायगडसह पुणे, कोकण, नाशिक, मराठवाड्यात शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी बरसल्यामुळे मुंबई-ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली. पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रमाण लक्षणीय होते. भारतीय हवामान विभागाने मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर पुढील ५ दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळने वर्तवला आहे. (Mumbai Rain Orange alert in Mumbai today Heavy rain warning for these districts)

हेही वाचा – Ganpati Festival-2023 : 156 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकींग मंगळवारपासून

- Advertisement -

शुक्रवारी मुंबईत पावसाची रिमझिम सुरू झाली. रात्री थोडाफार बरसल्यानंतर शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पावसाने मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पुढील ५ दिवसांत मान्सून सक्रिय होणार आहे. यानुसार कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – ठाकरे V/S फडणवीस…लढाई कुटुंबियांपर्यंत

- Advertisement -

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट 
मुंबईत पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. ठाणे आणि पालघर-मध्येही पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल, तर रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा- मुंबईत पहिल्याच पावसामुळे डोळ्यादेखत वाहुन गेल्या गाड्या, तर कुठं खांबाला बांधल्या

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
शनिवारी दुपारनंतरच्या मुसळधार पावसाने काही तासातच मुंबईची तुंबई केली. दादर, परळ, अंधेरी, मालाड, बोरीवली, कुर्ला, चेंबूर, मुलुंड, गोवंडीसह ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. अपुर्‍या नालेसफाईमुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले होते. अंधेरी सबवेत पाणी शिरल्याने काही काळ बंद ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -