घरताज्या घडामोडीMumbai Bank scam : प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा बुधवारपर्यंत दिलासा कायम, राज्य सरकारने...

Mumbai Bank scam : प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा बुधवारपर्यंत दिलासा कायम, राज्य सरकारने सत्र न्यायालयात मांडली भूमिका

Subscribe

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरेकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली. मजूर घोटाळ्या प्रकरणी दरेकरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा उत्तर मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा कायम ठेवला आहे. मुंबै बँक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देरकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली होती. फसवणूक करुन निवडणूक लढवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरेकरांविरोधात मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकरांवर अटकेची टांगती तलवार होती यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरेकरांना सत्र न्यायायलायने २१ मार्चपर्यंत दिलासा दिला होता. आज मुदत संपत आल्यामुळे पुन्हा सुनावणी करण्यात आली तेव्हा न्यायालयाने बुधवारपर्यंत दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबै बँकेची शाखा येते. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरेकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली. मजूर घोटाळ्या प्रकरणी दरेकरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. हायकोर्टात अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती. सत्र न्यायालयाने दरेकरांना २१ मार्च रोजीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. मुदताची आज शेवटचा दिवस असल्यामुळे पुन्हा सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने बुधवापरर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. सत्र न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने कोर्टात आपली भूमिका मांडली.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022: धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार – अजित पवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -